मानवत : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने तरुण कार्यकत्यार्ना जबाबदारी दिली आहे. मानवत शहराध्यक्षपदी नागनाथ कु-हाडे यांची तर युवा मोर्चा अध्यक्षपदी प्रवीण मगर, अल्पसंख्याक मोर्चा अध्यक्षपदी मुकद्दर शेख, शहर उपाध्यक्ष पदी रवी वाघमारे, अमोल कु-हाडे यांची निवड करण्यात आली आहे.
दि. १६ रोजी शहरातील दिव्यानंद गार्डन येथे झालेल्या बैठकीत पाथरी विधानसभा समन्वयक माजी आ. मोहन फड यांनी नियुक्ती पत्र दिले. यावेळी युवा नेते डॉ. अंकुश लाड, तालुका अध्यक्ष विकास मगर, पाथरी तालुका अध्यक्ष पप्पू नखाते यांची उपस्थिती होती. भारतीय जनता पक्ष नेहमीच इलेक्शन मोड असतो. लोकसभा, विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक होणार असल्याने पक्षाची जबाबदारी देताना तरुण कार्यकत्यार्ना संधी देण्यात येत आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकासाच्या दृष्टीमुळे समाजातील सर्व घटकांसाठी विकास योजना राबवण्यात येत आहेत. त्या सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवणार असल्याचे नवनियुक्त पदाधिका-यांनी सांगितले.
नवनियुक्त शहराध्यक्ष नागनाथ कु-हाडे हे संघ परिवारातील असून सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणा-या सारथी फाऊंडेशनचे सक्रिय सदस्य आहेत. नागेश्वर भक्त मंडळाच्या माध्यमातून ते धार्मिक क्षेत्रातही कार्यरत असतात.