24 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeराष्ट्रीयनरेंद्र मोदींनी दिला पंतप्रधानपदाचा राजीनामा

नरेंद्र मोदींनी दिला पंतप्रधानपदाचा राजीनामा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी दुपारी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. कॅबिनेटच्या बैठकीत लोकसभा विसर्जित करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता. हा प्रस्ताव राष्ट्रपतींकडे सादर केल्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा मंजूर केला आहे. नवीन सरकार येईपर्यंत ते काळजीवाहू पंतप्रधान असतील.

लोकसभा निवडणुकीत एनडीएला ३९२ तर इंडिया आघाडीला २३४ जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे देशात पुन्हा एनडीएची सत्ता येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानुसार बुधवारी पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेटची बैठक झाली. बैठकीत लोकसभा विसर्जित करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.

प्रस्तावाला कॅबिनेटने मंजूरी दिल्यानंतर हा प्रस्ताव राष्ट्रपतींकडे सादर करण्यात आला. त्याला राष्ट्रपतींनीही मंजूरी दिली. राष्ट्रपतींनी राजीनामा मंजूर केल्यानंतर मोदींना काळजीवाहू पंतप्रधान म्हणून काम करण्याची विनंती केली.

दरम्यान, आज दिल्लीत एनडीएची बैठक आहे. आंध्र प्रदेशचे भावी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारही या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. ते दोघेही सरकारमध्ये किंगमेकरची भूमिका बजावणार आहेत. त्यामुळे या बैठकीला महत्व प्राप्त झाले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR