32.5 C
Latur
Sunday, May 26, 2024
Homeमहाराष्ट्रलोकसभा निवडणुकीत निर्णायक ठरणार ‘नारी शक्ती’

लोकसभा निवडणुकीत निर्णायक ठरणार ‘नारी शक्ती’

राज्यात ४ कोटी ४४ लाख १६ हजार ८१४ महिला मतदार महिला मतदारांच्या संख्येत मोठी वाढ

मुंबई : प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीच्या मतदानात यंदा महिलाशक्ती निर्णायक ठरणार आहे. मागील वर्षात राज्यात मतदारांची संख्या लक्षणीय वाढली असून आता राज्यात ४ कोटी ४४ लाख १६ हजार ८१४ महिला मतदार आहेत. मागील चार निवडणुकांच्या तुलनेत यावर्षी १ हजार पुरुषांमागे ९२३ महिला अशी लक्षणीय वाढ झाली आहे.
दरम्यान, पाच टप्प्यात होणा-या आगामी लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांचे भवितव्य ठरविण्यात यंदा महिला मतदारांचा महत्वाचा वाटा असेल. कारण २००४, २००९, २०१४, आणि २०१९ च्या तुलनेपेक्षा २०२४ मध्ये महिला मतदारांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येते. त्यामुळे भविष्यात कुणाचे सरकार देशात येणार हे ठरवण्यात महिलांची भूमिका महत्त्वाची असणार आहे.

२००४ मध्ये पुरुष आणि महिला मतदार अशी स्वतंत्र नोंदणी करण्यात आलेली नव्हती. त्यामुळे त्यावर्षी एकूण ३ कोटी ४२ लाख ६३ हजार ३१७ मतदारांची नोंदणी झाली. २००९ आणि २०१४ या दोन्ही लोकसभा निवडणुकीसाठी करण्यात आलेल्या मतदार नोंदणीमध्ये महिला मतदारांची संख्या पुरुष मतदारांपेक्षा कमी होती. मात्र २०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी करण्यात आलेल्या मतदार नोंदणीत महिला मतदारांची संख्या वाढली आहे. २०११ च्या जनगणनेनुसार १ हजार पुरुषांमागे ९२५ महिला असे प्रमाण होते. सन २०१४ मध्ये मतदार यादीतील महिलांचे प्रमाण १ हजार पुरुषांमागे ८८९ महिला इतके होते. सन २०१९ मध्ये १ हजार पुरुषांमागे ९११ महिला असे प्रमाण होते. २०२४ मध्ये १ हजार पुरुषांमागे ९२३ महिला अशी लक्षणीय सुधारणा झाली आहे.

एकूण मतदार
२०१९ मध्ये एकूण मतदार ८ कोटी ८६ लाख ७६ हजार ९४६ मतदार असल्याची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये ४ कोटी ६४ लाख २५ हजार ३४८ पुरुष मतदार आहेत. तर ४ कोटी २२ लाख ७९ हजार १९२ महिला मतदार आणि २ हजार ४०६ तृतीयपंथी मतदार होते. २०२४ मध्ये ५ एप्रिल २०२४ नुसार एकूण ९ कोटी २६ लाख ३७ हजार २३० एकूण मतदार असल्याची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये ४ कोटी ८६ लाख ०४ हजार ७९८ पुरुष मतदार आहेत. तर ४ कोटी ४४ लाख १६ हजार ८१४ महिला मतदार आणि ५ हजार ६१८ तृतीयपंथी मतदार आहेत.

या तीन मतदारसंघात सर्वाधिक महिला मतदार
रत्नागिरी-ंिसधुदुर्ग :
पुरुषांपेक्षा २१,४७८+ महिला मतदार
एकूण मतदार – १४ लाख ४० हजार
महिला मतदार – ७ लाख ३५ हजार ५९७
रायगड :
पुरुषांपेक्षा २७,१६६+ महिला मतदार
एकूण मतदार – १६ लाख ५३ हजार ९३५
महिला मतदार – ८ लाख ४० हजार ४१६
भंडारा-गोंदिया :
पुरुषांपेक्षा ७,९५४+महिला मतदार
एकूण मतदार – १८ लाख २६ हजार ३०८
महिला मतदार – ९ लाख १७ हजार १२४
५ हजार तृतीयपंथी मतदार ( ५ एप्रिल २०२४ पर्यंतची नोंद)
साल एकूण मतदार पुरुष महिला तृतीयपंथी
२०१९ ८,८६,७६,९४६ ४,६४,२५,३४८ ४,२२,७९,१९२ २,४०६
२०२४ ९,२६,३७,२३० ४,८६,०४,७९८ ४,४४,१६,८१४ ५,६१८

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीपासून पुरुष मतदारांची संख्या ५१.४ लाखांनी म्हणजे १२ टक्क्यांनी वाढली, तर महिला मतदारांची संख्या ६२ लाखांनी म्हणजे १६.३ टक्यांनी वाढली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR