24 C
Latur
Wednesday, October 23, 2024
Homeमहाराष्ट्रनार्वेकरांनी ठाम रहावे; प्रकाश आंबेडकरांचे वक्तव्य

नार्वेकरांनी ठाम रहावे; प्रकाश आंबेडकरांचे वक्तव्य

मुंबई : शिवसेना आमदार अपात्रतेचा निर्णय काय लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. येत्या दोन दिवसात याप्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे निकाल सुनावणार आहेत. यादरम्यान वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आमदार अपात्रता सुनावणीबद्दल मोठे वक्तव्य केले. आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावर सुप्रीम कोर्ट अध्यक्षांना ताब्यात घेऊ पाहत आहे. म्हणून नार्वेकर यांनी सांगितले पाहिजे की मी निर्णय देणार नाही, जेव्हा द्यायचा तेव्हा मी देईल असे आंबेडकर म्हणाले.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे अध्यक्ष म्हणून सर्वोच्च न्यायालयाच्या खाली नाहीत, कायद्याचे राज्य चालले पाहिजे हे बरोबर आहे. राहुल नार्वेकर निर्णय देत नाहीत हे चुकीचे आहे, हे मी मान्य करतो. पण राहुल नार्वेकर अध्यक्ष म्हणून सर्वोच्च न्यायालयाच्या खाली नाहीत. तेव्हा सर्वोच्च न्यायालय जे अध्यक्षाला स्वत: ताब्यात घ्यायला बघते आहे; तेव्हा अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकर यांनी सांगितले पाहिजे, मी निर्णय देणार नाही, मला जेव्हा द्यायचे आहे तेव्हा देईल, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR