26.4 C
Latur
Tuesday, February 25, 2025
Homeराष्ट्रीयनाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांच्या कारचा दिल्लीत भीषण अपघात

नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांच्या कारचा दिल्लीत भीषण अपघात

नवी दिल्ली : नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांच्या कारचा राजधानी दिल्लीत भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. सुदैवाने हेमंत गोडसे हे अपघातातून बचावले आहेत. मात्र त्यांच्या कारचं मोठं नुकसान झाले आहे.

दरम्यान दिल्लीतील बी.डी. मार्गावर शिंदे गटाचे खासदार गोडसे यांच्या कारचा अपघात झाला. शिवजयंती निमित्त दिल्लीत कार्यक्रम असतो. संसदेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे, त्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी खासदार गोडसे हे काल राजधानीमध्ये आले होते.

आज कार्यक्रम संपल्यावर ते त्यांच्या निवासस्थानाच्या दिशेन परत जात असताना, एका गाडीला ओव्हरटेक करताना समोरून येणा-या एका वाहनाने त्यांच्या गाडीला जोरात  धडक मारली. आणि हा भीषण अपघात झाला. यामध्ये गोडसे यांना कोणतीही दुखापत झालेली नाही, पण त्यांच्या गाडीचे बरेच नुकसान झाले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR