22.2 C
Latur
Thursday, July 25, 2024
Homeमहाराष्ट्रनवनीत राणा यांचे मानसिक संतुलन बिघडले : बच्चू कडू

नवनीत राणा यांचे मानसिक संतुलन बिघडले : बच्चू कडू

कराड : नवनीत राणा सतत टी. व्ही. वर दिसायच्या त्यामुळे राणा जरा दबुन गेला होता. त्यांच्या घरात अंतर्गत कलह आहे. त्यामुळे स्वाभिमान पार्टीनेच भाजपाच्या नवनीत राणाला पाडले आहे. पण पराभवानंतर त्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे, पराभव त्यांना पचवता येत नाही. आता मलाच त्यांच्याकडे डॉक्टरांना पाठवावे लागेल अशी बोचरी टीका प्रहार जनशक्तीचे नेते आमदार बच्चू कडू यांनी केली.

कराड येथे सोमवारी आमदार बच्चू कडू यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी प्रहार जनशक्तीचे मनोज माळी व त्यांचे सहकारी उपस्थित होते. आमदार बच्चू कडू म्हणाले, गेल्यावेळी नवनीत राणा निवडून आल्या राष्ट्रवादीच्या पाठींब्यावर आणि नंतर मोदी यांच्याजवळ गेल्या. आतासुध्दा भाजपाचे राज्यात सरकार नाही आले तर स्वाभिमान पार्टी पुन्हा आघाडीबरोबर जाऊन बसेल. बायको भाजपात आणि हे स्वाभिमानमध्ये त्यामुळे लोकांमध्ये संभ्रम झाला. त्याचा फटका त्यांना बसला आहे. तुम्ही कपटी आहात अशी टीका तुमच्यावर होतेय याबाबत विचारताच बच्चू कडू म्हणाले, जे नालायक आहेत त्यांच्यासाठी आम्ही कपटीचे आहोत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR