32.4 C
Latur
Tuesday, February 27, 2024
Homeमनोरंजननयनताराला पती विघ्नेशने दिली महागडी कार गिफ्ट

नयनताराला पती विघ्नेशने दिली महागडी कार गिफ्ट

मुंबई : ‘जवान’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी दाक्षिणात्य अभिनेत्री नयनताराने या महिन्यात आपला वाढदिवस साजरा केला. १८ नोव्हेंबर रोजी अभिनेत्री ३९ वर्षांची झाली. आता तिचा पती विघ्नेश शिवन याने थोडा उशीरा का होईना पण आपल्या पत्नीला वाढदिवसाची अप्रतिम भेट दिली आहे. पतीकडून अशी भेट मिळाल्याने नयनताराही आनंदी आहे.

नयनताराच्या ३९व्या वाढदिवसानिमित्त विघ्नेशने तिला एक आलिशान मर्सिडीज मेबॅक कार भेट दिली आहे. या काळ्या रंगाच्या आलिशान कारची मूळ किंमत २.६९ कोटी रुपये आहे आणि टॉप एंड कारची किंमत ३.४० कोटी रुपये आहे. नयनताराने तिच्या चाहत्यांना तिच्या नवीन ब्रँडच्या कारची झलक दाखवली आणि तिच्या पतीचे आभार मानत प्रेम व्यक्त केले.
नयनताराने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर ब्रँडचा लोगो दाखवणारी दोन फोटो शेअर केली आहेत. फोटोसोबत तिने कॅप्शनमध्ये लिहिले – ‘वेलकम होम ब्युटी… ’ माझे प्रिय पती, वाढदिवसाच्या सर्वात गोड भेटवस्तूसाठी धन्यवाद, तुझ्यावर प्रेम आहे.

नयनतारा आणि विघ्नेशचे जून २०२२ मध्ये लग्न झाले होते. या वर्षी ऑक्टोबरमध्ये या जोडप्याने सरोगसीद्वारे जुळ्या मुलांचे स्वागत केले. उर रुद्रोनिल एन शिवन आणि उलग धैवाग एन शिवन अशी त्याच्या मुलांची नावे आहेत. अलीकडेच ही अभिनेत्री शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटामुळे चर्चेत होती. या चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. नयनतारा ‘जवान’ मध्ये मुख्य अभिनेत्री म्हणून दिसली आणि तिचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर हिट ठरला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR