मुंबई : राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हावर निवडणूक आयोगाकडून निकाल देण्यात आला असून निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह हे अजित पवार गटाला दिले असून शरद पवार गट हा स्वतंत्र्य गट असल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे आता निवडणूक आयोगाकडून राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाचा निर्णय स्पष्ट झाल्यानंतर आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
राष्ट्रवादी आमदार अपात्रतेचे प्रकरण हे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कोर्टात आहे. या निकालाची प्रक्रिया सध्या अंतिम टप्प्यात पोहचली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्याचप्रमाणे याच निर्णयावर अजित पवार गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे भवितव्य ठरणार आहे. हा निकाल १४ फेब्रुवारी निकाल लागण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाने जो निकाल शिवसनेच्या बाबतीत दिला, तोच निकाल राष्ट्रवादीच्या बाबतीत दिला आहे. परंतु राहुल नार्वेकर यांचा निकाल शिवसेनेच्या निकालाहून वेगळा निकाल राष्ट्रवादीच्या बाबतीत लागण्याची शक्यता आहे.