सोलापूर : महाराष्ट्र राज्याचे EDA पिडा अर्थात फेल ट्रिपल इंजिन सरकारच्या आणि केंद्रीय यंत्रणा ED सरकारच्या विरोधात, राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या वर ED कडून होणाऱ्या चुकीच्या कारवाई, जाणून बुजून चौकशीचे विरोधात सोलापूर शहर व जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने निषेध सोलापूर जिल्हा परिषद समोर निषेध आंदोलन करण्यात आले.
जिल्हाध्यक्ष बळीराम साठे व शहर अध्यक्ष भारत जाधव यांच्या प्रमुख नेतृत्वात सोलापूर शहरातील आणि जिल्ह्यातील अनेक मान्यवर प्रदेश, जिल्हा, शहर पदाधिकारी, महिला – युवती, युवकचे अध्यक्ष, कार्याध्यक्ष यांचेसह विविध सेलचे पदाधिकारी यांनी यावेळी राज्य आणि केंद्र सरकारच्या सुडाच्या कारवाई विरोधात, तसेच आमदार रोहित पवार यांच्या समर्थनार्थ घोषणा देत परिसर दणाणून सोडला. ये सरकार हमसे डरती है, ED को आगे करती है…रोहित दादा तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो, महाराष्ट्राचा एकच दादा – रोहित दादा, पवार साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, ह्या ED सरकारचे करायचे काय – खाली डोकं वर पाय अश्या घोषणा देत निषेध नोंदविला.