36.9 C
Latur
Saturday, June 1, 2024
Homeमुख्य बातम्यामोदी सरकार लक्षद्वीपमध्ये बांधणार नवीन विमानतळ

मोदी सरकार लक्षद्वीपमध्ये बांधणार नवीन विमानतळ

नवी दिल्ली : भारत आणि मालदीवमध्ये सुरू असलेल्या राजकीय वादात आता भारत सरकार मिनिकॉय बेटांवर नवीन विमानतळ बांधणार आहे. येथून लढाऊ विमाने, लष्करी विमाने आणि व्यावसायिक विमाने चालवता येतील अशी योजना आहे. त्यामुळे अरबी समुद्रात भारताची लष्करी ताकद वाढेल.

याशिवाय नागरी विमानेही येथे ये-जा करू शकतील. सध्या लक्षद्वीपमध्ये आगती येथे एकच हवाईपट्टी आहे. येथे सर्व प्रकारची विमाने उतरू शकत नाहीत.

या योजनेमुळे नौदल आणि हवाई दलासाठी हिंदी महासागर आणि अरबी समुद्रात ऑपरेशन करणे सोपे होईल. चीनच्या वाढत्या कारवायांना आळा घालणे सोपे होईल. मिनिकॉय बेटावर हवाईपट्टी बांधण्याचा पहिला प्रस्ताव भारतीय तटरक्षक दलाने दिला होता.

सध्याच्या प्रस्तावानुसार, हे नवीन विमानतळ भारतीय हवाई दलाकडून चालवले जाईल. लक्षद्वीपमध्ये नौदल आधीच मजबूत आहे, आता हवाई दल मजबूत होण्याच्या तयारीत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR