22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeसोलापूरगजानन नेरपगार सोलापूरचे नवे आरटीओ

गजानन नेरपगार सोलापूरचे नवे आरटीओ

सोलापूर : धाराशिवचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन नेरपगार यांची पदोन्नती झाली आहे. त्यांच्याकडे आता सोलापूर कार्यालयाचा पदभार सोपविण्यात आला असून पुढील आठवड्यापासून ते सोलापूरचे नवे प्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ) म्हणून कार्यभार सांभाळणार आहेत.

सोलापूर सर्वाधिक अपघाताच्या राज्यातील टॉपटेन जिल्ह्याच्या यादीत आहे. अनफिट वाहने, विनापरवाना वाहने चालविणे, रस्त्यावर थांबलेली वाहने, खड्ड्यांचे रस्ते, अपघातप्रवण ठिकाणी पुरेशा उपाययोजना नाहीत, क्षमतेपेक्षा जास्त मालाची किंवा प्रवाशांची वाहतूक, सलग आठ-दहा तास ड्रायव्हिंग, वाहनांचा अतिवेग, मद्यपान करून वाहन चालविणे, लेन कटिंग अशा प्रमुख कारणांमुळे अपघात व अपघाती मृत्यू वाढल्याची वस्तुस्थिती आहे.

जिल्हाधिकारी व जिल्ह्याच्या ज्येष्ठ खासदारांच्या अध्यक्षतेखाली रस्ता सुरक्षा समित्या कार्यरत असतानाही अपघात नियंत्रणात नाहीत हे विशेष. आता या बाबींकडे कटाक्ष ठेवून बेशिस्त वाहनांवरील कारवाईसाठी विशेष मोहीम राबविण्यात येईल, असे नूतन आरटीओ नेरपगार यांनी स्पष्ट केले आहे. अनफिट वाहने रस्त्यावरून धावणार नाहीत, याची खबरदारी घेतली जाईल, असेही ते म्हणाले.

पुढील आठवड्यात शाळा, महाविद्यालये सुरू होणार आहेत. प्रत्येक स्कूल बस चालकांनी विद्यार्थ्यांची वाहतूक करताना वाहतूक नियमांचे तंतोतंत पालन करणे जरुरी आहे. विद्यार्थ्यांच्या जिवाशी तडतोड खपवून घेतली जाणार नाही. विनापरवाना विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या रिक्षा चालकांवरही कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा नूतन आरटीओ नेरपगार यांनी दिला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR