35.1 C
Latur
Friday, May 24, 2024
Homeराष्ट्रीयवृत्तपत्र नोंदणी विधेयक संसदेत मंजूर

वृत्तपत्र नोंदणी विधेयक संसदेत मंजूर

नवी दिल्ली : वृत्तपत्र नोंदणी प्रक्रिया सुलभ करण्याच्या विधेयकाला संसदेने मंजुरी दिली आहे. प्रेस अँड जर्नल्स नोंदणी विधेयक, २०२३ लोकसभेत आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आले. राज्यसभेने ३ ऑगस्ट रोजी हे विधेयक मंजूर केले होते. हे विधेयक प्रेस अँड रजिस्ट्रेशन ऑफ बुक्स (पीआरबी) कायदा, १८६७ ची जागा घेईल. माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी ही माहिती दिली.

ते म्हणाले की, हे विधेयक सोपे आहे आणि वृत्तपत्रे आणि मासिकांच्या नोंदणीसाठी एकत्रित प्रक्रियेची तरतूद आहे. यापूर्वी वृत्तपत्रे किंवा मासिकांना आठ टप्प्यांच्या नोंदणी प्रक्रियेतून जावे लागत होते. आता हे एका बटणाच्या क्लिकवर करता येईल. तसेच लोकसभेचे कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आले आहे. सध्याचे अधिवेशन २२ डिसेंबरपर्यंत चालणार होते, मात्र ते एक दिवस आधी तहकूब करण्यात आले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR