22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeराष्ट्रीयनितीश आणि ममता बॅनर्जी 'इंडिया' आघाडीचे मुख्य शिल्पकार : काँग्रेस

नितीश आणि ममता बॅनर्जी ‘इंडिया’ आघाडीचे मुख्य शिल्पकार : काँग्रेस

नवी दिल्ली : मुख्यमंत्री नितीश कुमार पुन्हा एकदा भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) सामील होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यावरून काँग्रेसने भारतीय जनता पक्षावर (भाजप) गंभीर आरोप केले आहेत. दरम्यान, नितीश कुमार आणि ममता बॅनर्जी विरोधी पक्षांच्या ऐक्याचे आणि २८ पक्षांच्या युतीचे (इंडिया आघाडीचे) मुख्य शिल्पकार आहेत, असे काँग्रेसने म्हटले आहे. आमदार आणि विरोधी पक्षांमध्ये तोडफोड केल्याचा आरोप करत काँग्रेस पक्षाने म्हटले आहे की, भारतात पक्षांमध्ये मतभेद नाहीत, परंतु भाजप गळचेपी करण्याचा प्रयत्न करत आहे.

बिहारमध्ये सुरू असलेल्या राजकीय गोंधळामुळे काँग्रेसची टिप्पणी अत्यंत गंभीर मानली जात आहे. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश म्हणाले की, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी नितीश यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आहे, मात्र अद्याप चर्चा झालेली नाही.’ व्यस्त वेळापत्रकामुळे नितीश आणि खर्गे यांच्यात संपर्क होऊ शकला नाही. खर्गे यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशीही बोलण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांना पत्र लिहिले आहे. विरोधी पक्षांच्या ऐक्याचे आणि २८ पक्षांच्या युतीचे नितीश कुमार आणि ममता बॅनर्जी मुख्य शिल्पकार आहेत.

जयराम रमेश यांच्या म्हणण्यानुसार, त्यांना खात्री आहे की ते दोघेही इंडिया आघाडीचा एक भाग राहतील. तसेच काँग्रेस पक्षानेही भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणांवर जोरदार हल्ला चढवला. माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी इस्रायलमध्ये मजूर म्हणून काम करण्यासाठी जाणाऱ्या कामगारांचा उल्लेख करताना तिखट प्रश्न उपस्थित केले आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR