24 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeराष्ट्रीय  प्रचारात लहान मुलांना ‘नो एन्ट्री’

  प्रचारात लहान मुलांना ‘नो एन्ट्री’

निवडणूक आयोगाने जारी केली नियमावली

नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाने आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. सोमवारी निवडणूक आयोगाने एक पत्रक जारी केले. यात लहान मुले आणि अल्पवयीन मुलांना निवडणूक प्रचारात सहभागी न करण्याच्या कडक सूचना केल्या आहेत.

लहान मुले किंवा अल्पवयीनांनी प्रचार पत्रिका वाटताना, पोस्टर्स चिकटवताना, घोषणाबाजी करताना किंवा पक्षाचे झेंडे आणि बॅनर घेऊन फिरताना दिसू नये, असे यात सांगण्यात आले आहे.
निवडणूक आयोगाचे म्हणणे आहे की, मुलांना निवडणुकीशी संबंधित कामात किंवा निवडणूक प्रचाराच्या कामात सहभागी करुन घेणे खपवून घेतले जाणार नाही. या सूचनांमध्ये लहान मुलांना कोणत्याही प्रकारच्या राजकीय प्रचारात, मग ते कविता वाचण, गाणी, घोषणा इत्यादींमध्ये सामील न करण्यास सांगितले आहे.

आयोगाने म्हटले की, कोणत्याही पक्षाने त्यांच्या निवडणूक प्रयत्नांमध्ये मुलांचा सहभाग असल्याचे आढळले, तर बालमजुरीशी संबंधित सर्व कायद्यांतर्गत कारवाई केली जाईल. याबाबत कार्यवाही करण्याची जबाबदारी जिल्हा निवडणूक अधिकारी व रिटर्निंग अधिका-यांना देण्यात आली आहे. दरम्यान, मुलगा त्याच्या पालकांसोबत तिथे असेल, तर याला मार्गदर्शक तत्त्वाचे उल्लंघन मानले जाणार नाही.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR