25.7 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeराष्ट्रीयजगातील कोणतीही शक्ती ३७० परत आणू शकत नाही

जगातील कोणतीही शक्ती ३७० परत आणू शकत नाही

श्रीनगर : जम्मू-काश्मीर मधील कलम ३७० कलमाबाबत सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच निर्णय दिला आहे. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कलम ३७० पुन्हा लागू करण्याबाबत विरोधी पक्षांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये पंतप्रधान मोदी यांनी विश्वातील कोणतीच शक्ती कलम ३७० पुन्हा लागू करू शकत नाही असे विधान केले आहे.

पंतप्रधान मोदी म्हणाले की सर्वोच्च न्यायालयाने निश्चीत केले आहे की देशात कुठल्याही स्थितीत दोन कायदे चालू शकत नाहीत. त्यांनी सांगितले खी कलम ३७० हटवणे कुठल्याही राजकारणापेक्षाही अधिक जम्मू-काश्मीर आणि लद्दाखच्या लोकांसाठी आवश्यक होते. जम्मू काश्मीरचा विकास आणि तेथील लोकांचे जीवन सोपं बनवण्यासाठी आवश्यक होते. पंतप्रधान मोदी यांनी पीडीपी आणि नॅशनल कॉन्फ्रसवर देखील टीका केली, ते म्हणाले की परिवारवाद्यांनी आपल्या राजकीय स्वार्थासाठी ताब्यात घेण्यात आलं होतं, जम्मू-काश्मीर मधील सामन्य लोक या राजकारणाचा भाग नव्हते आणि ते बनू देखील इच्छित नाहीत. ते भूतकाळातील अडचणीतून बाहेर पडून सामान्य नागरिकांप्रमाणे कुठल्याही भेदभावाशिवाय आपल्या मुलांचे भविष्य आणि वर्तमान सुरक्षित करु इच्छितात.

लडाख येथील चित्र पालटले
पंतप्रधान मोदींनी दावा केला की कलम ३७० काढल्यानंतर जम्मू आणि काश्मीर तसेच लडाख येथील चित्र पालटले आहे. येथे सिनेमागृह सुरु झाले आहेत. तेथे दहशतवादी नव्हे तर पर्यटकांची जत्रा भरत आहे. तेथे दगडफेक नाही तर चित्रपटांची शुटिंग होत आहे. पीएम मोदी यांनी सांगितले की राजकीय स्वार्थामध्ये लोक कलम ३७० बद्दल भ्रम पसरवत होते. त्यांना मी स्पष्टपणे सांगेन. आता विश्वातील कोणतीही शक्ती कलम ३७० परत आणू शकत नाही.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR