28.9 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeराष्ट्रीयकोणत्याही योजना बंद केल्या जाणार नाहीत : भजनलाल शर्मा

कोणत्याही योजना बंद केल्या जाणार नाहीत : भजनलाल शर्मा

जयपूर : राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी सोमवारी सांगितले की, जनतेशी संबंधित कोणत्याही योजना बंद केल्या जाणार नाहीत. भाजप प्रदेश कार्यालयात सोमवारी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंती सोहळ्यात मुख्यमंत्री भजनलाल शर्मा बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, आता राज्यकारभार बदलला आहे, राज्यात सुशासन आले आहे. भाजप सरकारच्या काळात जनतेशी संबंधित कोणत्याही योजना बंद होणार नाहीत. सार्वजनिक सेवांमध्ये सार्वजनिक सुविधांचा विस्तार केला जाईल.

ते म्हणाले की, सरकार १०० दिवसांच्या कृती योजनेवर काम करत आहे. भाजपच्या जाहीरनाम्यातील सर्व आश्वासने सरकार पूर्ण करेल. सरकारने आयुष्मान योजनेंतर्गत ५ लाख रुपयांची मर्यादा वाढवून १० लाख रुपये केली, आता राज्यात या योजनेअंतर्गत खर्च करण्यात येणारी रक्कम २५ लाख रुपयांपर्यंत वाढविण्याचे काम सुरू आहे. भाजप सरकारच्या राजवटीत मोफत औषधोपचार थांबवले जाणार नसून, मोफत योजनेंतर्गत रुग्णांना गंभीर आजारांवर उपयुक्त औषधे उपलब्ध करून देण्याची व्यवस्था केली जाईल.

माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी ट्विट करून विद्यमान भाजप सरकारकडून काँग्रेसच्या योजनांवर भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली होती. चिरंजीवी योजनेचा संदर्भ देताना गेहलोत म्हणाले होते की, चिरंजीवी योजनेंतर्गत खाजगी रुग्णालयांकडून उपचार दिले जात नसल्याचेही माध्यमांद्वारे समोर आले आहे. सध्याच्या सरकारनेही आमच्या सरकारच्या योजनांबाबत परिस्थिती स्पष्ट करावी, जेणेकरून जनतेला कोणतीही अडचण येऊ नये. नवीन प्रणाली लागू होईपर्यंत जुनी व्यवस्था सुरू ठेवावी.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR