21.5 C
Latur
Monday, January 20, 2025
HomeUncategorizedपुर्णेत इलेक्ट्रिक लोकोशेड उभारणीसाठी आंदोलनाचा इशारा

पुर्णेत इलेक्ट्रिक लोकोशेड उभारणीसाठी आंदोलनाचा इशारा

पूर्णा : पूर्णा जंक्शन हे सन १९१२ पासुन कार्यान्वित असून या ठिकाणी मिटरगेज रेल्वे लाईनचे स्टीम लोकोशेड कार्यान्वित होते. या स्टीम लोको शेडला साउथ सेन्ट्रल रेल्वेने डीजेल आणि इलेक्ट्रिेक लोको शेडमध्ये रुपांतरीत केले आहे. परंतू येथील स्टीम लोको शेड बंद करण्यात आले व काझीपेठ, लालगुडा आणि विजयवाडा डीजेल आणि इलेक्ट्रिक लोको शेडमध्ये रुपांतरीत केले नाही. पूर्णा येथे इलेक्ट्रीक लोको शेडसाठी साऊथ सेंट्रल रेल्वेने पाठविला नाही तर येणा-या काळात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने रेलरोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

पूर्णा जंक्शनची कन्नेक्टीविटी मनमाड, परभणी, बसमत, हिंगोली, अकोला, परळी, लातूर, उस्मानाबाद, आदिलाबाद, नागपूर, निझामाबाद, तिरुपती, काचीगुडा या रेल्वेस्थानकांना आहे. पूर्णा जंक्शन येथून काझीपेठ, लालगुडा आणि विजयवाडा येथील इलेक्ट्रिक लोकोशेड ४५० किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे साउथ सेन्ट्रल रेल्वेला पूर्णा जंक्शन हे लोकोची देखभाल करण्याकरिता वेळ कमी लागणार आहे म्हणून येथे इलेक्ट्रि क लोको शेड करणे अत्यंत गरजेचे आहे.

साउथ सेन्ट्रल रेल्वेच्या प्रधान कार्यालयातील विद्युत विभागातील अधिकारी बी.श्रीनावासू सिकंदराबाद यांनी दि.२८ डिसेंबर रोजी रेल्वे मंत्रालय दिल्ली यांना दिलेल्या उत्तरात कळविले आहे की साउथ सेन्ट्रल रेल्वेने इलेक्ट्रिक लोको शेड करिता प्रस्ताव सादर केलेला नाही असे कळविले आहे. पूर्णा जंक्शन येथे शेकडो एक्कर जमीन पडीत असून ही रेल्वेच्या मालकीची आहे. या ठिकाणी सी.डब्लू वर्क शॉप, रेल्वे यार्ड, रेस्ट हाऊस-रनिंग रूम, रेल्वे क्वार्टर, इंग्लिश शाळा, हॉस्पिटल, कम्युनिटी हॉल इत्यादी पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत.

रेल्वे मंत्रालय दिल्ली येथे दि.८जानेवारी रोजी साउथ सेन्ट्रल रेल्वेकडून इलेक्ट्रिक लोको शेडचा प्रस्ताव पूर्णा जंक्शन करिता मागविण्यात यावा या करिता वंचित बहुजन आघडीच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे. हा प्रस्ताव साउथ सेन्ट्रल रेल्वेने पाठविला नाही तर येणा-या काळात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने रेल्वे रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे युवक जिल्हाध्यक्ष तुषार गायकवाड यांनी दै.एकमत प्रतिनिधीशी बोलताना सांगितले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR