22.8 C
Latur
Sunday, July 14, 2024
Homeपरभणीपरभणी जलतरणीका प्रकरणी महानगर पालिकेला नोटीस

परभणी जलतरणीका प्रकरणी महानगर पालिकेला नोटीस

परभणी : शहरातील स्टेडीयम परीसरात मागील एक महिन्यापासून बंद असलेल्या परभणी जलतरण प्रकणात याचिकाकर्ते दिलीप मोरे यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे. सदरील याचिकेत गुरुवारी मा. उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपिठाणे सुनावणी घेऊन महानगर पालिकेला नोटीस काढली आहे. या नोटीसद्वारे महापालिकेला पुढील तारखेला आपले म्हणणे मांडण्याचे आदेश दिले आहेत.

सदरील प्रकरणात महानगरपालिका यांनी वर्ष २०२२-२३चे थकीत लाईट बिल न भरल्यामूळे जलतरण तलाव बरेच दिवस बंध राहिल्यामूळे याचिकाकर्ते यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. तसेच शहर वासियांना जलतरण तलाव सुविधा उपलब्ध होऊ शकली नाही.

याचिकाकर्ते यांनी सदरील प्रकारणात मा. उच्च न्यायालयच्या निदर्शनास आणून दिले की, याचिकाकर्ते यांनी दिवाणी न्यायालयात पैसे भरून सुद्धा महानगर पालिकाने जलतरण तलाव सुरु केलेला नाही. मा. उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांचे मन्हने ऐकून महानगर पालिकेला नोटीस काढली आहे व पुढील तारखेला आपले मन्हणे मांडायला सांगितले आहे. याचिकाकर्ते दिलीप मोरे यांच्या तर्फे अ‍ॅड.विशांत कदम यांनी बाजू मांडली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR