17.5 C
Latur
Thursday, January 9, 2025
Homeमहाराष्ट्रमराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याची अधिसूचना जारी

मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याची अधिसूचना जारी

मुंबई : प्रतिनिधी
मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यात आला आहे. त्यानंतर आज केंद्रीय सांस्कृतिक मंत्री शेखावत यांनी यासंदर्भातला शासन आदेश जारी केला आहे. याबाबत मंत्री उदय सामंत यांनी माहिती दिली. माननीय शेखावत यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा दिला आहे त्याची अधिसूचना महाराष्ट्राकडे सुपुर्द केली आहे. त्यामुळे मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शेखावत यांचे आभार मानतो असे उदय सामंत यांनी सांगितले.

येत्या आठ ते पंधरा दिवसांत जे काही प्रस्ताव सादर करायचे असतात ते सादर करू. प्राकृत भाषेचा जो मराठी भाषेला दर्जा मिळाला आहे. सदानंद मोरे यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास केला जातो आहे. त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठीचे आश्वासन शेखावत यांनी दिले.

सामंतांनी मानले आभार
३१ जानेवारी आणि १ तसेच २ फेब्रुवारी या दिवशी पुण्यात मराठी विश्वसंमेलनाच्या उद्घाटनाला शेखावत हे येणार आहेत. मी आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्रिमंडळाच्या वतीने मी शेखावत यांचे आभार मानतो. मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन आंतरराष्ट्रीय पातळीवर व्हावे यासाठी प्रयत्न करणार आहोत. ज्या ज्या साहित्यिकांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवण्यासाठी प्रयत्न केले त्यांनाही मी धन्यवाद देतो.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR