22 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeछत्रपती संभाजीनगरआता शेतक-यांच्या कर्जमुक्तीसाठी आंदोलन

आता शेतक-यांच्या कर्जमुक्तीसाठी आंदोलन

जालना : शेतकरी देखील आमचाच आहे. सरकार शेतक-यांच्या कर्जमुक्तीसाठी लक्ष द्यायला तयार नाही. आता आम्ही या प्रश्नात लक्ष घालणार, सरकार कसे कर्जमाफी देणार नाही हे आम्ही बघतो असा निर्धार मनोज जरांगे यांनी आज पत्रकार परिषदेत व्यक्त केला. मराठा आरक्षणानंतर आता आगामी विधानसभा निवडणूक लढण्याच्या तयारीत असताना शेतकरी कर्जमाफीवर जरांगे यांनी घेतलेल्या भूमिकेने राज्यातील राजकारणाला नवे वळण मिळू शकते.
शेतक-यांच्या आंदोलनाबाबत चर्चा करून निर्णय घेऊ.

आता शेतक-यांच्या प्रश्नावर जास्त ताकद लावणार, असल्याचेही जरांगे यांनी जाहीर केले. तसेच निवडणुकीचे आणखी नियोजन नाही. राज्यभरात विधानसभा मतदार संघानिहाय घोंगडी बैठक घेणारे. याची सुरुवात ५ सप्टेंबरपासून गेवराई मतदार संघातून होईल. यावेळी आमची भूमिका लोकसंसमोर मांडणार. घोंगडी बैठकीचा समारोप कुठे करायचा यांबाबत समाजाची भूमिका जाणून घेऊ, असेही जरांगे म्हणाले.

आमचे आरक्षण ओबीसीत आहे. दिल्लीशी आम्हाला काहीही देणे घेणे नाही. त्यांना वेळ काढून न्यायचा होता. सरकार वाटत असलेले पैसे आमचेच आहेत, सरकार काही त्यांचे घर विकून पैसे देत नाही. सरकार आरक्षण देत नाही. चणे आणि रेवड्या देत आहे. आम्ही कट्टर हिंदू आहोत आणि आमचा डीएनए ओबीसींचा आहे एवढेच माहीत आहे असे जरांगे यांनी निक्षून सांगितले.

ही लढाई गरिबांची आहे. गरीब कसा मोठा होत नाही ते आपण बघू. माझी मागणी गरिबांना न्याय देण्यासाठी आरक्षण देण्यासाठी आहे. हिंदूच हिंदूला आरक्षण द्यायला विरोध का करतोय. आम्हाला देखील आमचा अभिमान आहे मग लाठ्याकाठ्या मारायलाच मराठा का दिसतो, असा सवाल जरांगे यांनी केला. मराठयांनी आणि शेतक-यांनी लेकराला मोठें करायचा आनंद असावा. आपल लेकरू शेतात काम करत असताना मोठं झालं पाहिजे आणि शेतातून तुम्हाला लोकांनीं खांद्यावर घेऊन गुलाल टाकून मिरवणूक काढत गावात आणायला हवं.

फडणवीसांनी हेरगिरीसाठी ड्रोन ठेवले
रात्री इकडे ड्रोन आले होते ते फडणवीस यांचेच ड्रोन आहेत, त्यांनीच हेरगिरी करायला ड्रोन ठेवले आहेत, असा आरोप करत जरांगे यांनी तुम्ही काहीच करू शकणार नाही, तुमच्या ड्रोनने गोळ्या घातल्या तरी हरकत नाही. मी नसलो तरी माझा समाज तयार आहे, असे आव्हान फडणवीस यांना दिले. आमच्या मागे ईडी लावायला आमच्याकडे मुंबईला जाण्यासाठीचे तिकिटाचे पैसे नाहीत. इथे सगळे अपक्षच उभे राहतील निवडणूक कशी हे लढणार हे आता सांगणार नाही, अन्यथा फडणवीस यांना तो कळेल, अशी मिश्किल टोलेबाजी जरांगे यांनी केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR