17.3 C
Latur
Saturday, November 23, 2024
Homeराष्ट्रीयआता बाप्पाचं विसर्जन दणक्यात; ढोलताशा पथकात ३० पेक्षा जास्त सदस्यांना मुभा

आता बाप्पाचं विसर्जन दणक्यात; ढोलताशा पथकात ३० पेक्षा जास्त सदस्यांना मुभा

सुप्रीम कोर्टाचा आदेश, राष्ट्रीय हरित लवादाच्या निर्णयाला तात्पुरती स्थगिती, गणेश मंडळांना दिलासा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
गणेशोत्सव काळात ध्वनीप्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय हरित लवादाने मिरवणुकी दरम्यानच्या ढोलताशा पथकात ३० सदस्यांपेक्षा अधिक सदस्य नसावेत, असा निर्णय सुनावला होता. या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. यावर सुप्रीम कोर्टाने हरित लवादाच्या निर्णयाला स्थगिती दिली. त्यामुळे १७ सप्टेंबर रोजी विसर्जन मिरवणुकीत ढोल-ताशा पथकात ३० पेक्षा जास्त सदस्यांना तात्पुरती मुभा मिळाली आहे. त्यामुळे गणपती मंडळांना दिलासा मिळाला आहे.

ध्वनी प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर उत्सवाच्या काळात आवाजाची तीव्रता वाढू नये, यासाठी राष्ट्रीय हरीत लवादाकडे याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेची दखल घेत हरित लवादाने गणेशोत्सव काळात ध्वनिप्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी काही अटी-शर्ती ठेवल्या होत्या. त्यानुसार आवाजाची तीव्रता वाढू नये, यासाठी काही नियम घालण्यात आले होते. पण या विरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर आज सुनावणी पार पडली. यावेळी कोर्टाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेत हरित लवादाच्या आदेशाला तात्पुरती स्थगिती दिली.

गणपती विसर्जनाच्या दिवशी १७ तारखेला एका दिवशी परवानगी देण्याचा निर्वाळा सुप्रीम कोर्टाने दिला आहे. त्यामुळे गणपती मंडळांना मोठा दिलासा मिळाला आहे.ढोल-ताशा पथकामध्ये ३० पेक्षा जास्त वादक नसावे, असा आदेश हरित लवादाने दिला होता. या आदेशाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली. हरित लवादाने गेल्या ३० ऑगस्ट रोजी वादकाच्या संख्येसंदर्भात आदेश दिला होता. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी पार पडली. सुनावणीदरम्यान सरन्यायाधीशांनी हरित लवादाच्या निर्णयाला स्थगिती दिली.

तात्पुरती स्थगिती
हरीत लवादाच्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाकडून तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. हरित लवादाने ढोल-ताशा साऊंडच्या आवाजावर अटी लावल्या होत्या. त्या विरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. या प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. यावेळी सुप्रीम कोर्टाने एका दिवसासाठी मुभा दिली पाहिजे, असा निर्वाळा सुप्रीम कोर्टाने दिला. सुप्रीम कोर्टातील वकील सिद्धार्थ शिंदे यांनी याबाबत माहिती दिली.

आता विसर्जन दणक्यात!
१७ सप्टेंबरला पुण्यात गणेश विसर्जनाच्या वेळी काहीच रिस्ट्रिक्शन नसेल. याचिकाकर्त्यांचे म्हणणे होते की, वर्षातून एक दिवस असतो आणि त्यामध्येही तुम्ही ध्वनी प्रदूषणाच्या नावावर अटी लावल्या तर चुकीचा संदेश जात आहे. याचाच अर्थ येत्या १७ सप्टेंबरला गणपती विसर्जन जोरात होईल, असे म्हणावे लागेल, अशी प्रतिक्रिया वकील सिद्धार्थ शिंदे यांनी दिली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR