22.9 C
Latur
Saturday, July 27, 2024
Homeमहाराष्ट्रभाजपचे आता ‘गाव चलो’ अभियान

भाजपचे आता ‘गाव चलो’ अभियान

बावनकुळे यांची माहिती गडकरींसह अनेक नेत्यांचा सहभाग

मुंबई : यंदाचे वर्ष हे निवडणुकांचे वर्ष आहे. आधी लोकसभा आणि नंतर विधानसभेची निवडणूक लागण्याबाबत सर्वत्र चर्चा सुरु आहे. तशातच आज भाजपाकडून एका नव्या अभियानाची घोषणा करण्यात आली. हे अभियान नक्की काय आणि त्यातून नक्की काय केले जाणार आहे, याबद्दल भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माहिती दिली.

भाजपतर्फे ४ ते ११ फेब्रुवारी या काळात व्यापक जनसंपर्कासाठी गाव चलो अभियान राबविण्यात येणार आहे. भाजपा मुंबई कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत बावनकुळेंनी ही माहिती दिली. या अभियानात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील सर्व मंत्री, केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्यासह पक्षाचे सर्व केंद्रीय मंत्री, राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, प्रदेश पदाधिकारी, खासदार, आमदार त्यांना दिलेल्या गावात एक दिवस मुक्कामी राहणार आहेत असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. आपण स्वत: अमरावती जिल्ह्यातील साऊर येथे एक दिवस राहणार आहोत असेही त्यांनी नमूद केले.

ते म्हणाले की, आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उत्तम संघटनात्मक बांधणी करत, विकासाचा अजेंडा डोळ्यासमोर ठेवून भाजपा कार्य करत आहे. तळागाळातील प्रत्येक मतदारापर्यंत मोदी सरकारचे मागच्या १० वर्षातील प्रभावी कार्य, मागच्या जाहीरनाम्यातील आश्वासनांची केलेली पूर्ती, विकसित भारताचा संकल्प सांगणा-या यंदाच्या अंतरिम अर्थसंकल्पातील ठळक तरतुदी ही सर्व माहिती पोहोचण्याच्या उद्देशाने ‘गाव चलो अभियान’ हाती घेण्यात आले आहे. मोदीजीं ची गॅरंटी काय आहे हे प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवण्यासाठी मागच्या १० वर्षातील मोदी सरकारच्या योजना व उल्लेखनीय कामगिरीची माहिती देणारी पत्रके वितरित करण्यात यÞेणार आहेत.

कोणत्या नेत्याला कोणते गाव?
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर जिल्ह्यातील पारडंिसगा येथे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नागपूर जिल्ह्यातील धापेवाडा ( ता. कळमेश्वर ) मुंबई अध्यक्ष आ. आशीष शेलार हे गुरामवाडी (ता. मालवण), रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे हे जालना जिल्ह्यातील वालसावंगी येथे एक दिवस मुक्कामास जाणार आहेत. पीयूष गोयल, डॉ. भारती पवार, डॉ. भागवत कराड, कपिल पाटील हे केंद्रीय मंत्रीही या अभियानात सहभागी होणार आहेत. शहरी भागात वॉर्ड निहाय हे अभियान राबविले जाईल. केंद्रीय सरचिटणीस विनोद तावडे हे विलेपार्ले येथे या अभियानात सहभागी होणार आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR