29.5 C
Latur
Monday, January 20, 2025
Homeमहाराष्ट्रमनगटावरच्या प्रत्येक राखीची शपथ... लाडकी बहिण योजना बंद पडू देणार नाही!

मनगटावरच्या प्रत्येक राखीची शपथ… लाडकी बहिण योजना बंद पडू देणार नाही!

मुंबई : विशेष प्रतिनिधी
माझ्या मनगटावर बांधलेल्या प्रत्येक राखीची मी शपथ घेतो की, लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही. लाडकी बहिण या योजनेने महिलांना स्वावलंबी बनवून सक्षम केले आहे. या योजनेमुळे लाडक्या बहिणींना स्वत:च्या पायावर खंबीरपणे उभे राहण्यास मदत झाली आहे, आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील महिलांनी महायुतीला पाठिंबा द्यावा, असे आवाहन अजित पवार यांनी केले.

महिलांनी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी छोटे व्यवसाय सुरू करण्यासाठी या पैशांचा वापर केला आहे. दुस-या एका घटनेत एका महिलेने दोन महिन्यांचा हप्ता आणि स्वत:च्या बचतीतून शिवणयंत्र विकत घेतले आहे. राज्यभरात अशा अनेक महिलांच्या यशोगाथा समोर येत असल्याचे त्यांनी अधोरेखीत केले. अडीच कोटींहून अधिक महिलांना पाच महिन्यांचा एकूण ७,५०० रुपयांचा हप्ता मिळाला आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

निवडणुकीनंतर महायुती सरकारकडून योजनेच्या निधीत वाढ करण्यात येईल, महिलांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल आभार मानत अजित पवार म्हणाले की, महाराष्ट्रातील माझ्या बहिणी आगामी निवडणुकीत ही योजना संपवण्याचे स्वप्न पाहणा-यांना चोख प्रत्युत्तर देतील.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR