22.9 C
Latur
Saturday, July 27, 2024
Homeमहाराष्ट्रअहमदनगरला उद्या ओबीसींचा महाएल्गार

अहमदनगरला उद्या ओबीसींचा महाएल्गार

नगर : येथील क्लेरा ब्रूस हायस्कूल मैदानावर उद्या (दि. ३ फेब्रुवारी) ओबीसीचा महाएल्गार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याला दीड ते दोन लाख ओबीसी बांधव येतील, असा दावा आयोजकांकडून करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने नगरमध्ये जोरदार तयारी करण्यात आली आहे.

या मेळाव्याच्या नियोजनासाठी सात वेगवेगळ्या समित्या गठित करण्यात आल्या असून जवळपास ५०० स्वयंसेवक तैनात असणार आहेत. ओबीसी महाएल्गार मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी सात समित्या नियुक्त करण्यात आल्या आहेत. ज्यात पाणीवाटप समिती, पार्किंग, वाहतूक नियमन, आरोग्य,नाश्ता वाटप, मुख्य स्टेज नियोजन समिती यांचा समावेश करण्यात आलेला आहे. तर मेळावा परिसरामध्ये तीन कार्डीयाक रुग्णवाहिकांसह पाच रुग्णवाहिका असतील, ठिकठिकाणी मेडिकल किटचे वितरण करण्यात येणार आहे. या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर सात ठिकाणी वाहन पार्किंग व्यवस्था करण्यात आलेली आहे.

मराठा समाजाला ओबीसीमधून नव्हे तर स्वतंत्र प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी ओबीसी समाजाची आहे आणि त्या पार्श्वभूमीवर या महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या महाएल्गार मेळाव्यात राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, आमदार राम शिंदे,आमदार गोपीचंद पडळकर, माजी मंत्री महादेव जानकर , आमदार प्रकाश शेंडगे, कल्याण दळे, लक्ष्मण गायकवाड , शब्बीर अन्सारी, पी.टी. चव्हाण , दौलत शितोळे, सत्संग मुंडे, लक्ष्मण हाके या ओबीसी नेत्यांची उपस्थिती असणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

२५ हजार हरकती नोंदवणार

विशेष म्हणजे या मेळाव्या दरम्यान मराठा आरक्षणावर हरकती घेणा-या जवळपास २५ हजार अर्ज वाटप करून ते अर्ज भरून घेतले जाणार आहेत. त्यासाठी स्वतंत्र व्यवस्था या महाएल्गार मेळाव्याच्या ठिकाणी असणार आहे, अशी माहिती समता परिषदेचे राज्य उपाध्यक्ष अंबादास गारुडकर यांनी दिली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR