परभणी : योगामुळे शरीराची लवचिकता वाढून निरोगी राहण्यास मोठी मदत होते. प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी दैनंदिन कामात व्यस्त असतात. यामुळे त्यांनी योगाचा दैनंदिन आयुष्यात अवलंब करून घ्यावा, असे प्रतिपादन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राहुल गिते यांनी केले.
राष्ट्रमाता माँ साहेब जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त आयुष कक्ष (आरोग्य विभाग), निरामय योग प्रसार व संशोधन केंद्र आणि महाराष्ट्र आरोग्य वर्धिनी योग शिक्षक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने जि.प. अधिकारी व कर्मचा-यांसाठी १५ दिवसांचे योग शिबिर मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथूर यांच्या संकल्पनेतून आयोजित केले आहे. या शिबिराचे उद्घाटन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गिते यांच्या हस्ते दि.१३ जानेवारी रोजी झाले. याप्रसंगी योग वर्गात उपस्थित अधिकारी, कर्मचा-यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी जिल्हा आयुष अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर वडमिलवार, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रावजी सोनवणे, राहुल झांबड, बुरांगे, सुभेदार भरत गायकवाड यांची उपस्थिती होती. प्रस्तावना योग प्रशिक्षक तथा योग संघटनेचे अध्यक्ष गजानन चौधरी यांनी केली. यादरम्यान नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेच्या विद्यार्थ्यांनी शिबिरात सहभाग घेतला. मुख्य योग शिक्षक झांबड यांनी प्रात्यक्षिकासह योग मार्गदर्शन केले. सह योग शिक्षक चंद्रकांत देशमुख व शरयू यादव यांनी प्रात्यक्षिक करून दाखवले.
यशस्वीतेसाठी योग प्रशिक्षक गजानन चौधरी, वसंत पारवे, सुंदरदास मोरे, नितीन यादव, कैलास सोमवंशी, अशोक तळेकर, काकडे, सचिन रायपत्रीवार, चंद्रकांत देशमुख, डॉ.पूजा ढाकरगे, सोनी सोळंके, अंकुश गरड, अरुण पाठक, कैलास बेले, आरती शिंदे, सतीश भरोसे, अविनाश राऊत, मयांक सोनटक्के, अमोल राऊत यांनी परिश्रम घेतले.