23.1 C
Latur
Saturday, September 28, 2024
Homeराष्ट्रीयओम बिर्ला यांची १८ व्या लोकसभेच्या अध्यक्षपदी निवड

ओम बिर्ला यांची १८ व्या लोकसभेच्या अध्यक्षपदी निवड

पंतप्रधान,राहुल गांधींनी दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली : लोकसभा अध्यक्षांसाठी आज झालेल्या मतदानानंतर एनडीएचे उमेदवार ओम बिर्ला यांची १८ व्या लोकसभेच्या अध्यक्षपदी निवड झाली. आवाजी मतदानाने अध्यक्षपदाची निवड प्रक्रिया पूर्ण झाली. ओम बिर्ला यांच्या निवडीनंतर पंतप्रधान मोदी आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी त्यांना अध्यक्षांच्या खुर्चीपर्यंत नेले आणि त्यांना शुभेच्छा दिल्या. याआधी मोदींनी ओम बिर्ला यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला होता. तर विरोधकांच्या वतीने शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी लोकसभा अध्यक्षपदासाठी के. सुरेश यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला.

दरम्यान, अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाबाबत एनडीए आणि इंडिया आघाडी यांच्यात एकमत न झाल्याने विरोधकांनी मंगळवारी के. सुरेश यांना उमेदवारी दिली. तर एनडीएने १७ व्या लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास व्यक्त केला होता. अशा स्थितीत राजस्थानच्या कोटा-बुंदी लोकसभा मतदारसंघातून तीनवेळा निवडून आलेले खासदार ओम बिर्ला आणि केरळच्या मावेलिकारामधून आठव्यांदा निवडून आलेले खासदार के. सुरेश यांच्यात थेट लढत होती. भारताच्या निवडणूक इतिहासात विरोधकांनी लोकसभा अध्यक्षपदासाठी उमेदवार उभा करण्याची ही पहिलीच वेळ होती.

पंतप्रधान मोदींनी अभिनंदन केले

ओम बिर्ला यांची लोकसभा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले. तसेच पाच वर्षे तुमचे मार्गदर्शन मिळेल असा विश्वास असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, शास्त्रात लिहिले आहे की नम्र आणि चांगले वागणारा माणूस यशस्वी होतो. तुमचे गोड हसणे आम्हाला आनंदित करते. तुम्ही नवा इतिहास घडवला आहे, असे मोदी म्हणाले.

विरोधी पक्षनेत राहुल यांनीही दिल्या शुभेच्छा

दरम्यान, खुद्द विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ओम बिर्ला यांना आसनस्थ केले. यानंतर त्यांनी लोकसभा अध्यक्षांचे अभिनंदन केले आणि सरकारवर हल्लाबोल केला. राहुल म्हणाले की, आज सरकारकडे बहूमत आहे. पण विरोधक जनतेचा आवाज आहे. यामुळे विरोधकांचा आवाज दाबता येणार नाही, असा इशाराही त्यांना लोकसभा अध्यक्षांना दिला. आम्हाला आमचा आवाज उठवण्याची संधी मिळेल अशी खात्री आहे. विरोधकांचा आवाज दाबणे हे लोकशाही विरोधी आहे, असे ही राहुल म्हणाले.

 

 

 

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR