28.9 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeराष्ट्रीयओमर अब्दुल्ला असतील जम्मू-काश्मीरचे पुढील मुख्यमंत्री : फारूख अब्दुल्ला

ओमर अब्दुल्ला असतील जम्मू-काश्मीरचे पुढील मुख्यमंत्री : फारूख अब्दुल्ला

श्रीनगर : जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीत नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसची आघाडी विजयाकडे वाटचाल करत आहे. निवडणूक निकालानुसार काँग्रेस-एनसीने बहुमताचा टप्पा ओलांडला आहे. दरम्यान, नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारूख अब्दुल्ला यांनी मोठे वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की, ओमर अब्दुल्ला हे जम्मू-काश्मीरचे पुढील मुख्यमंत्री असतील. लोकांनी आपला जनादेश दिला आहे. त्यांनी ५ ऑगस्ट रोजी घेतलेला निर्णय मान्य नसल्याचे सिद्ध केले आहे, असा दावाही फारूख अब्दुल्ला यांनी यावेळी केला.

नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला हे बडगाममधून विजयी झाले आहेत. त्यांनी पीडीपीचे आगा सय्यद मुनताजीर ​​मेहदी यांचा १८,४८५ मतांनी पराभव केला.

ओमर अब्दुल्ला यांना ३६०१० तर त्यांचे प्रतिस्पर्धी आगा सय्यद मुनताजीर ​​मेहदी यांना १७५२३ मते मिळाली. ओमर अब्दुल्ला हे यापूर्वी जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री राहिले आहेत. २००९ ते २०१५ या काळात ते जम्मू-काश्मीरचे अखेरचे मुख्यमंत्री होते. यावेळी त्यांनी गांदरबल आणि बडगाममधून विधानसभा निवडणूक लढवली. गांदरबल विधानसभा मतदारसंघात मतमोजणीच्या २० फे-या होणार आहेत. मतमोजणीच्या १५ व्या फेरीत नॅशनल कॉन्फरन्सचे उमेदवार ओमर अब्दुल्ला यांना ३०७३६ मते मिळाली आहेत. तर पीडीपीचे उमेदवार बशीर अहमद मीर यांना २०९७० मते मिळाली आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR