27.6 C
Latur
Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्रसोमवारी धनगर समाजाचा राज्यभर रास्तारोको

सोमवारी धनगर समाजाचा राज्यभर रास्तारोको

सरकारमध्ये असलो तरी मी आधी समाजाचा गोपीचंद पडळकरांचा एल्गार

मुंबई : धनगर समाजाला एसटीमध्ये आरक्षण मिळावे यासाठी २३ तारखेला राज्यभर रास्ता रोको करण्यात येणार असल्याची माहिती भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिली. यासाठी सर्वांनी एकत्र यावे असे आवाहन पडळकरांनी धनगर समाजाला केले आहे. सरकारमध्ये जरी असलो तरी आधी मी समाजाचा असल्याचे गोपीचंद पडळकर म्हणाले. आदिवासी समाज आरक्षणाबाबत गरज नसताना जर आक्रमक होत असेल तर धनगर समाज सुद्धा आपली ताकद येत्या सोमवारी दाखवेल असे पडळकर म्हणाले.

मी सरकारमध्ये जरी असलो तरी सरकारच्या विरोधात आंदोलन का करतोय तर मी आधी समाजाचा असल्याचे पडळकर म्हणाले. सरकार सगळ्या बाबतीत सकारात्मक आहे, मी तशा प्रकारची कागदपत्र सुद्धा सरकारकडे दिली असल्याचे ते म्हणाले. शासन निर्णय करताना कधी कुठली प्रोसेस आहे या सगळ्या बाबतची माहिती आम्हाला समितीकडून मिळाली असल्याचे पडळकर म्हणाले. आदिवासी नेते आणि काहीजण मुद्दामून सरकारवर जीआर निघू नये यासाठी दबाव टाकत आहेत. आम्ही आदिवासी नेत्यांना विनंती करतो की आमच्या सोबत आणि सरकार सोबत चर्चा करा असे पडळकर म्हणाले.

आदिवासींच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही
आदिवासी समाजाच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागणार नाही. हे आम्ही लिहून दिले आहे. सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिले आहेत, त्यानुसार एसटीमध्ये वर्ग करून आम्हाला आमचे आरक्षण मिळणार आहे. आदिवासी नेते जर म्हणत असतील आम्ही पाणी कट करू, रूळ उखडून टाकू तर आम्ही सुद्धा मागे राहणार नाहीत असेही पडळकर म्हणाले. आम्ही येत्या सोमवारी २३ तारखेला सकाळी ११ वाजता राज्यभर रास्ता रोको आंदोलन करणार आहोत.

समाज आरक्षणापासून वंचित
१९८० पासून धनगर समाजाच्या आंदोलनाला सुरुवात झाली होती. धनगर समाज हा अनुसूचित जमातीत असून केवळ धनगड व धनगर या शब्दामुळे स्वातंत्र्यापासून हा समाज आरक्षणापासून वंचित राहिल्याचा दावा आंदोलन करीत आहेत. धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती द्या, या मागणीला तसेच स्वातंत्र्यापासून सुरुवात झाली असली तरी १९८० पासून या आंदोलनाने वेग घेतला. निवडणुकीच्या तोंडावर अनेक वेळा सर्वच पक्षांनी धनगर समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन देऊन त्यांची फसवणूक केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR