25.4 C
Latur
Saturday, September 28, 2024
Homeराष्ट्रीयअधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी इंडिया आघाडीच्या खासदारांनी केले निदर्शने

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी इंडिया आघाडीच्या खासदारांनी केले निदर्शने

नवी दिल्ली : १८ व्या लोकसभेचे पहिले अधिवेशन आजपासून सुरू झाले आहे. पहिल्या दिवशी पंतप्रधान मोदींसह मंत्रिमंडळातील सर्व खासदारांनी लोकसभा सदस्य म्हणून शपथ घेतली. तर इतर खासदार उद्या म्हणजेच मंगळवारी शपथ घेणार आहेत. दरम्यान, इंडिया आघाडी पक्षांच्या खासदारांनी संसदेच्या संकुलात हातात संविधानाच्या प्रति घेऊन प्रोटेम स्पीकर भर्तृहरी महताब यांच्या विरोधात निदर्शने केली.

यावेळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी, पक्षाचे नेते राहुल गांधी, सपाचे अध्यक्ष खासदार अखिलेश यादव पत्नी खासदार डिंपल यादव यांच्या सह अन्य खासदार उपस्थित होते.

यावेळी काँग्रेस खासदार गौरव गोगोई म्हणाले की, सत्ताधारी पक्ष आपला अहंकार विसरलेला नसून, देशाच्या प्रमुख समस्यांकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे, असा आरोप केंद्र सरकारवर केला. के सुरेश यांची प्रोटेम स्पीकर म्हणून नियुक्ती झाली असती, तर भारतातील संपूर्ण दलित समाजाला आनंद झाला असता आणि सर्वांना ऐतिहासिक दृश्य पाहायला मिळाले असते, असे ही गोगोई म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR