28.9 C
Latur
Sunday, February 25, 2024
Homeसोलापूरदुचाकीवरून पडल्याने एकाचा मृत्यू, एकजण जखमी

दुचाकीवरून पडल्याने एकाचा मृत्यू, एकजण जखमी

कुर्डुवाडी – बाहेर जेवण करून घराकडे परतत असताना दुचाकीवरून पडून दुचाकीवर मागे बसलेल्या तरुणाचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला तर दुचाकी चालक जखमी झाला आहे. ही घटना कुर्डुवाडी-पंढरपूर रोडवर कुर्डु शिवारात घडली.

मृताचे वडील बलभीम सदाशिव जाधव (रा. म्हैसगाव, ता. माढा) यांच्या फिर्यादीवरून मोटारसायकल चालक साहील खुदबुद्दीन आतार (रा. म्हैसगाव) याच्याविरुद्ध कुर्डुवाडी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. बाबासाहेब बलभीम जाधव(वय २५, रा.म्हैसगाव) असे मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे. फिर्यादीचा मुलगा बाबासाहेब हा त्याचा मित्र साहील सोबत त्याच्याकडील मोटारसायकलवरून (एमएच ४५, एएन १८३८) कुर्डुवाडी येथे आले होते. फिर्यादीने मुलगा बाबासाहेब याला फोन करून जेवणासाठी विचारले असता त्याने मी बाहेर जेवण करून येत असल्याचे सांगितले. त्यानंतर रात्री दहाच्या सुमारास फिर्यादीला झोपेत असताना फिर्यादीचा भाऊ दादासाहेब जाधव यांचा फोन आला आणि अपघाताची घटना कळाली. ही घटना समजताच फिर्यादी व त्यांचा भाऊ मोटारसायकलवरून कुईवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात पोहोचले असता तिथे फिर्यादीचा मुलगा बाबासाहेब याला डोक्यास व कपाळाला मार लागल्याचे दिसले. त्यात त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तर त्याचा दुसरा जोडीदार मोटारसायकल चालक साहील हा जखमी झाल्याने त्याला बार्शी येथे पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले.

फिर्यादी बलभीम जाधव यांच्या फिर्यादीवरून मोटारसायकल चालक साहील आतार याने हयगयीने, निष्काळजीपणे मोटारसायकल चालवून मोटारसायकलवरून पडून गंभीर जखमी होऊन फिर्यादीचा मुलगा बाबासाहेब याच्या मृत्यूस व मोटारसायकलच्या नुकसानीस कारणीभूत झाला असल्याबाबत गुन्हा दाखल झाला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR