28.8 C
Latur
Thursday, March 13, 2025
Homeमहाराष्ट्रपुणेकर उकाड्याने हैराण; पारा ३६ अंशांवर

पुणेकर उकाड्याने हैराण; पारा ३६ अंशांवर

पुणे : प्रतिनिधी
शहरात गेल्या काही दिवसांपासून कमाल तापमानाचा पारा ३५ ते ३६ अंशांवर जात असल्याने दिवसा कमालीचा उकाडा जाणवत आहे. पहाटे थंडी अन् दिवसभर उन्हाचा तडाखा असे वातावरण तयार झाले आहे. मंगळवारी कोरेगाव पार्क येथे ३६ अंश तापमानाची नोंद झाली.

दरवर्षी फेब्रुवारीच्या दुस-या आठवड्यात कमाल तापमानाचा पारा ३५ ते ३६ अंशांवर जातो, मात्र गेल्या चार ते पाच दिवसांपासून शहरातील कमाल तापमान ३५ अंशांवर गेले.

त्यामुळे दुपारी १२ ते ४ या वेळीच अंगाची काहिली करणारा उकाडा जाणवत आहे, तर पहाटे शहरात थंडी जाणवत आहे. त्यामुळे कमाल आणि किमान तापमानात मोठी दरी तयार झाली आहे. त्यामुळे शहरात सर्दी, खोकला आणि तापाचे रुग्ण वाढत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR