21.5 C
Latur
Monday, January 20, 2025
Homeमहाराष्ट्रसिद्दिकी हत्येप्रकरणी आणखी एकाला अटक

सिद्दिकी हत्येप्रकरणी आणखी एकाला अटक

मुंबई : माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी अकोला येथून सलमानभाई इकबालभाई वोहरा याला अटक करण्यात आली असून तो गुजरातमधील रहिवासी आहे. वोहराने या प्रकरणातील आरोपींना आर्थिक मदत केल्याचा आरोप आहे.सलमानभाई इकबालभाई वोहरा हा गुजरातमधील पेतलाड येथील रहिवासी आहे.

मुंबईच्या गुन्हे शाखेने त्याला स्थानिक पोलिसांच्या मदतीने अकोला येथील बालापूर येथून अटक केले. गुजरातमधील आनंद नगर येथील त्याच्या बँक खात्यातून या प्रकरणातील अटक आरोपी गुरनैल सिंहचा भाऊ नरेशकुमार सिंह, रुपेश मोहोळ, हरिशकुमार यांना पैसे पाठवण्यात आल्याचा आरोप आहे. याशिवाय त्यांनी इतर व्यक्तींनाही आर्थिक मदत केली आहे. ती रक्कम कटात सहभागी आरोपींनी वापरल्याचा संशय आहे. याप्रकरणी गुन्हे शाखा अधिक तपास करीत आहे. ही या प्रकरणातील २५ वी अटक आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR