21.5 C
Latur
Saturday, February 24, 2024
Homeराष्ट्रीयमहिलांसाठी विधानसभेत एक तृतियांश जागा राखीव; उद्योजकतेत २४% वाढ

महिलांसाठी विधानसभेत एक तृतियांश जागा राखीव; उद्योजकतेत २४% वाढ

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अंतरिम अर्थसंकल्प २०२४ सादर केला असून त्यांनी महिलांसाठी अनेक गोष्टींचा उल्लेख केला आहे. यामध्ये आतापर्यंत महिलांसाठी केलेल्या कामाचा लेखा-जोखा वाचला तसेच भविष्यात महिलांविषयी कोणत्या गोष्टींवर भर दिला जाणार आहे त्याबाबत सांगितले.

१) सरकारी प्रयत्नामुळे महिलांची उद्योजकता २४ टक्क्यांनी वाढवली गेली असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

२) पंतप्रधान आवास योजनेंतर्गत ७० टक्के महिलांना घरे दिल्याने त्यांचा सन्मान वाढला आहे.

३) एक कोटी महिलांना लखपती दीदी योजनेचा लाभ मिळाला आहे हा आकडा तीन कोटी रुपयांपर्यंत नेला जाणार आहे.

४) सर्व्हायकल कँसरबाबत ९ ते १४ वर्ष वयोगटातील महिलांना मोफत लसीकरण करण्यात येणार आहे.

५) गेल्या दशकात विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित अभ्यासक्रमांमध्ये महिलांची नोंदणी २८ टक्क्यांनी वाढली आहे.

६) तीन तलाक प्रथेला बेकायदेशीर ठरविले.

७) महिलांसाठी विधानसभेमध्ये एक तृतीयांश जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR