29.3 C
Latur
Sunday, April 21, 2024
Homeमहाराष्ट्रतुमच्यासाठी दारंच काय, खिडक्याही उघड्या

तुमच्यासाठी दारंच काय, खिडक्याही उघड्या

वंचितला ‘एमआयएम’ने घातली साद

मुंबई : महाविकास आघाडीसोबतची बोलणी फिस्कटल्यानंतर वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकरांनी दोनच दिवसांपूर्वी आपले ८ उमेदवार जाहीर केले. आणि मराठा आरक्षणासाठी लढा देणा-या मनोज जरांगे पाटलांशी सामाजिक युती जाहीर केली. आता वंचितला ‘एमआयएम’ या जुन्या मित्राने साद घातली आहे.

लोकसभा निवडणुकीत राज्यात तिसरी आघाडी निर्माण करण्याची तयारी असदुद्दीन ओवेसींच्या एमआयएमने सुरू केली आहे. २०१९च्या लोकसभा निवडणुकीत वंचित आणि एमआयएमची युती होती. त्यामुळे ९ जागांवर काँग्रेस, राष्ट्रवादीचे उमेदवार पराभूत झाले. २०१९ मध्ये केलेला प्रयोग पुन्हा करण्याचा ओवेसी यांचा मानस आहे. त्यामुळे एमआयएमने वंचितला सोबत येण्यासाठी साद घातली आहे.
छत्रपती संभाजीनगरचे खासदार आणि एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी वंचितला पु्न्हा एकत्र येण्याचा प्रस्ताव दिला आहे. प्रकाश आंबेडकर यांच्यासाठी आमचे दरवाजेच काय, खिडक्याही खुल्या आहेत. त्यांनी एमआयएमसोबत येऊन राज्यात एक नवं समीकरण तयार करायला हवं, असे जलील म्हणाले.

काही गोष्टींमुळे आमची आघाडी संपुष्टात आली. पण प्रकाश आंबेडकरांनी आता याबद्दल विचार करायला हवा. सध्याची राजकीय स्थिती पाहून निर्णय घ्यायला हवा. बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी फुटेल असा विचारही कोणी केलेला नव्हता. काका शरद पवार आणि पुतण्या अजित पवार वेगळे होतील याची कल्पना कोणीही केलेली नव्हती. अशा स्थितीत आम्ही चांगला पर्याय देऊ शकतो, असे जलील यांनी म्हटले..

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR