22.7 C
Latur
Saturday, July 27, 2024
Homeमनोरंजनऑस्कर २०२४ मध्ये ‘ओपेनहायमर’चा दबदबा

ऑस्कर २०२४ मध्ये ‘ओपेनहायमर’चा दबदबा

नवी मुंबई : ९६ व्या अकादमी पुरस्कार म्हणजेच ऑस्कर पुरस्कार २०२४ लॉस एंजेलिस, येथील डॉल्बी थिएटरमध्ये आयोजित करण्यात आला होता. यावेळी ऑस्कर सोहळ्यात हॉलिवूड अभिनेता रॉबर्ट डाउनी ज्युनियरला पहिला ऑस्कर पुरस्कार मिळाला. तर यावेळी रशिया-युक्रेन युद्धावर बनवलेल्या माहितीपटालाही ऑस्कर मिळाला.

भारतीय वेळेनुसार ११ मार्च रोजी पहाटे ४ वाजता ऑस्करचे प्रसारण सुरू झाले. ऑस्कर पुरस्कार हा मनोरंजन जगतातील सर्वात प्रतिष्ठेचा पुरस्कार मानला जातो. यावेळी या पुरस्कार सोहळ्यात ‘ओपेनहायमर’चा दबदबा पहायला या चित्रपटाला वेगवेगळ्या श्रेनीमध्ये ७ पुरस्कार मिळाले.

हॉलिवूडचे दिग्गज दिग्दर्शक ख्रिस्तोफर नोलन यांच्या ओपेनहायमर चित्रपटाला ऑस्कर २०२४ एकूण १३ श्रेणींमध्ये नामांकन मिळाले होते. तर दुस-या क्रमांकावर ‘पुअर थिंग्ज’ चित्रपट होता, ज्याला ११ श्रेणींमध्ये नामांकन मिळाले होते. तर अभिनेता लिओनार्डो डिकॅप्रियोच्या ‘किलर्स ऑफ द फ्लॉवर मून’ ला १० नामांकने मिळाली होती. याशिवाय ‘टू किल अ टायगर’ हा माहितीपटही नामांकनात होता. हा माहितीपट भारतातील एका छोट्या गावावर आधारित आहे. जो कॅनडामध्ये राहणा-या निशा पाहुजा यांनी बणवला होता.

ऑस्कर २०२४ विजेत्यांची यादी:

श्रेणी विजेता

सर्वोत्तम चित्र ओपेनहायमर
सर्वोत्तम दिग्दर्शक क्रिस्टोफर नोलन
सर्वोत्तम अभिनेता किलियन मर्फी
सर्वोत्तम अभिनेत्री एम्मा स्टोन
सहाय्यक अभिनेता रॉबर्ट डाउनी जूनियर
सहाय्यक अभिनेत्री डेव्हिन जॉय रँडॉल्फ
रूपांतरीत पटकथा अमेरिकन फिक्शन
मूळ पटकथा एनाटॉमी ऑफ ए फॉल
व्हिज्युअल इफेक्ट्स गॉडजिला माइनस वन
कॉस्ट्यूम डिझाइन पूअर थिंग्स
मेकअप व केशरचना पूअर थिंग्ज
सिनेमेटोग्राफी ओपेनहायमर
प्रोडक्शन डिझाइन पूअर थिंग्ज
सर्वोत्तम साँड द जोन ऑफ इंटरेस्ट
सर्वोत्तम फिल्म संपादन ओपनहायमर
ओरिजनल स्कोअर ओपेनहायमर
सर्वोत्तम ओरिजनल गीत व्हाट वाज आई मेड
एनिमेटेड शार्ट फिल्म ऑर इज ओवर जॉन
अ‍ॅक्शन शॉर्ट फिल्म -द वंडरफुल स्टोरी ऑफ हेनरी शुगर

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR