23.9 C
Latur
Saturday, July 27, 2024
Homeसोलापूरवादळी वारा अन् पावसामुळे फळबागा भुईसपाट; शाळा, घरांवरचे पत्रे उडाले

वादळी वारा अन् पावसामुळे फळबागा भुईसपाट; शाळा, घरांवरचे पत्रे उडाले

अकलूज :वादळी वाऱ्यासह जोरदार पावसामुळे नातेपुते, फोंडशिरस, दहीगांव, मोरोची, धर्मपुरी, पिंपरी, कोथळे, मांडवे आदी भागांमध्ये केळीच्या बागा, डाळिंब, ऊस भुईसपाट झाला असून, अनेक घरांचे पत्रे उडाले, तर नातेपुते येथील नातेपुते एज्युकेशन सोसायटीच्या प्राथमिक विभागातील चौथ्या मजल्यावरील पाच वर्गाचे पत्रे उडून गेले आहेत.

ऐन उन्हाळ्यात टँकरद्वारे पाणी देऊन तळहातावरील फोडाप्रमाणे जपलेल्या केळी, डाळिंब, ऊस, पेरू, आबा, फळबागा वादळी वाऱ्यामुळे क्षणात उद्ध्वस्त झाल्या. यामुळे शेतकरी व नागरिकांचे लाखोंचे नुकसान झाले. अनेकांच्या घरावरील पत्रे उडून गेले असल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. याबाबत शासनाने तत्काळ पंचनामे सुरू करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.
नातेपुते-फोंडशिरस रोडवरील ३० एकर उसांचे नुकसान झाले असून वादळी वाऱ्याने सर्व उसाचे शेंडे तुटून गेल्याने आमचे प्रचंड नुकसान झाले आहे. कडक उन्हाळ्यात पोटच्या मुलांसारखे उसाचे पीक जोपासले होते, शासकीय अधिकाऱ्याने तत्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई मिळावी.

नातेपुते प्राथमिक विभागातील चौथ्या मजल्यावरील पाच वर्गाचे वादळामुळे पत्रे उडून गेली असून सुमारे १० लाख रुपयांचे नुकसान झाले असून लवकरात लवकर वर्गाची दुरुस्ती करून शाळा सुरू होण्यापूर्वी वर्गाची व्यवस्था करण्याचे प्रयल केले जातील, नातेपुते परिसरात ३० घरांवरी पत्रे उडाले असून अनेक घरांचे नुकसान झाले आहे. ६० ते ७० हेक्टरवरील फळबागाचे नुकसान झाले आहे. सर्व पंचनामे सुरू असून लवकरात लवकर पंचनामे करून अहवाल वरती पाठवून मदतीसाठी प्रयत्न केले जातील असे प्रशासनाने सांगीतले.

नातेपुते परिसरातील नातेपुते व फोंडशिरस परिसरात महावितरणचे मोठे नुकसान झाले असून धर्मपुरी, फॉडशिरस, मोरोची, दहीगांव, पिंपरी, मांडवे या भागांतील अंदाजे १२० पोल पडले असून अनेक ठिकाणी तारा तुटून पडल्या असून अनेक डीपीचे मोठे नुकसान झाले आहे. सर्वत्र दुरुस्ती चालू असू लवकरात लवकर वीज चालू करण्याचा प्रथल राहील यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे. असे महावितरण उपअभियंता प्रमोद सोनवणे म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR