22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeसोलापूरअतिरिक्त शिक्षकांना नियुक्ती आदेश द्या

अतिरिक्त शिक्षकांना नियुक्ती आदेश द्या

सोलापूर : भाषा विषयात विलीन होऊ इच्छिणाऱ्या अतिरिक्त समाजशास्त्र शिक्षकांचे समुपदेशन घेण्यात आले. त्यांना नियुक्ती आदेश देण्यात आले नाहीत. ते आदेश द्यावेत, अशी मागणी प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे यांच्याकडे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाने निवेदनाद्वारे केली आहे. प्राथमिक शिक्षणाधिकारी पदाचा पदभार घेतल्यानंतर अंधारे यांचा जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

त्यानंतर त्यांनी निवेदन देऊन अतिरिक्त शिक्षकांना नियुक्ती आदेश देण्याची मागणी केली. यावेळी महाराष्ट्र राज्य प्रा. शिक्षक संघाचे कार्यकारी अध्यक्ष म.ज. मोरे, जिल्हा संघाचे नेते बब्रुवान काशीद, जिल्हाध्यक्ष अनिरुध्द पवार, जिल्हा सरचिटणीस सूर्यकांत हत्तुरे-डोगे, जिल्हा कार्यकारी अध्यक्ष रणजित थिटे, जिल्हा संपर्कप्रमुख प्रमोद कुसेकर उपस्थित होते. बारा अतिरिक्त शिक्षकांचे समुपदेशन झाले आहे, त्यांना नियुक्ती आदेश द्यावेत, मान्य टक्केवारीनुसार विज्ञान, भाषा व समाजशास्त्र विषय शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणी द्यावी, वरिष्ठ वेतनश्रेणीस पात्र शिक्षकांना मागील अनुशेषासह वरिष्ठ वेतन श्रेणीचा लाभ विनाविलंब मिळावा, अशा विविध मागण्यांचे निवेदन प्राथमिक शिक्षणाधिकारी यांना दिले आहे.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR