30.6 C
Latur
Tuesday, February 25, 2025
Homeपरभणीपरभणीत पुर्णवाद संगीत समारोहाचे आयोजन

परभणीत पुर्णवाद संगीत समारोहाचे आयोजन

परभणी : ग्रंथराज पुर्णवाद अमृत महोत्सवी वर्षा निमित्त ५, ६ व ७ जानेवारी रोजी ओम पुर्णवादी संगीत कला अकादमीच्या वतीने अक्षदा मंगल कार्यालय, परभणी येथे पुर्णवाद संगीत समारोहाचे आयोजन करण्यात आले आहे. तीन दिवशीय या समारोहात दि. ५ रोजी सांयकाळी ६.३० ते ९ या वेळेत उद्घाटन समारंभ होणार असून परमपुज्य डॉ. विष्णु महाराज पारनेरकर यांची उपस्थीती राहणार आहे. याच वेळी सतारवादक पंडीत उस्मान खाँ साहेब यांच्या हस्ते येथील सुरमनी डॉ. कमलकरराव परळीकर यांना जिवन गौरव पुरस्कारांनी सन्मानीत करण्यात येणार आहे.

दि. ६ जानेवारी रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत शास्त्रीय गायनाची मैफिल होणार असून यात ग्वालेर घराण्याची सुप्रसिध्द गायीका अपूर्वा गोखले यांचे गायन होणार आहे. त्यांना तबला स्वप्नील भीसे, हार्मोनियमवर डॉ. चैतन्य कुटे साथ संगत करणार आहेत. दुपारी ४ ते ५.३० या वेळेत प्रमुख घराण्याचे रियाज आणि सांगीतिक सौंदर्यस्थळे या विषयावरील सभा होणार आहे. यात डॉ. चैत्यन कुटे (पुणे) डॉ. अतिद सरवडीकर (मुंबई), विश्वेस सरदेशपांडे (मुंबई), मानस विश्वरुप (मुंबई), सुरश्री शिवानजी दसवकर (पुणे) यांचे गायन होणार असून त्यांना तवल्यावर अभिजीत वारटक्के तर हार्मोनियमवर बीराजदार चक्रदेव हे साथसंगत करतील. याच दिवशी तीस-या सत्रात भज गोविंदम एक वेगळ्या प्रकारचा भरतनाट्यम नृत्यविष्काराचे सादरीकरणर होणार आहे. याच्या नृत्य कलाकार डॉ. स्वाती दैठणकर सादरीकरण करणार आहेत. चौथ्या सत्रात प.पु. डॉ. विष्णु महाराज पारनेरकर यांच्या उपस्थीतीत मराठवाड्यातील संगीत क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या ऋषितुल्य कलावंताचा कृतज्ञता समारंभ आयोजीत केला आहे.

दि. ७ जानेवारी रोजी सकाळी १० ते १२ खुलामंच राहणार असून दुस-या सत्रात दुपारी ४ ते ५.३० तन्मय देवचके, अशीष कुलकर्णी यांचे तबला वादन तर तीस-या सत्रात सायंकाळी ६ ते ७.३० पंडीत माणीकराव मुंढे, सुखदेव मुंढे यांचे पखवाज वादन होणार आहे. चौथ्या सत्रात रात्रो ८ ते १० या वेळेत पद्मश्री पंडीत उल्हासजी कशाळकर यांचे गायन होणार असून यात संवादीनीवर तन्मय देवचक्के तर तबला आशय कुलकर्णी यांची साथसंगत राहणार आहे.

या तीन दिवशीय कार्यक्रमात श्रोते आणि रसीकांनी उपस्थीत रहावे असे आवाहन संयोजीका तथा ओम पुर्णवादी संगीत कला अकादमीच्या अध्यक्षा डॉ. संगीता गुणेश पारनेरकर, संगीत संमेलनाध्यक्ष तसेच स्वागताभिलाशी एकनाथ (अनिल) मोरे जीवन कला मंडळ, परभणीचे अध्यक्ष भागवत खोडके पाटील उपाध्यक्षा, शशी अय्यर, परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व्यंकटेश कुरुंदकर, सचिव, गणेश जोशी, पुर्णवादी संगीत कला अकादमी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशपांडे, विनय मोहरीर आदींने केले आहे. या कार्यक्रमा संदर्भात अक्षय कुलकर्णी, सौ. वैष्णवी मुळे, श्रीकांत देशपांडे, विनय मोहरीर यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR