पुणे : दर वर्षी आपण आपली फलटण मॅरॅथॉनचे आयोजन करत असतो. या वर्षी ७ वे वर्ष आहे. दर वर्षी लोकांचा उत्साह वाढतच आहे. लोकांना व्यायामाची सवय लागावी , सगळ्यांचे आरोग्य उत्तम राहावे या शुद्ध हेतूनेच आपण ही मॅरॅथॉन सुरू केली आहे. दर वर्षी आपण एक मोठी हस्ती बोलावून त्यांचे सर्वांना मागदर्शन आणि त्यांच्या हस्ते मॅरॅथॉनची बक्षीस वाटप असा उपक्रम आपण घेत असतो.
आतापर्यंत डॉ. शरद हर्डीकर माननीय स्वर्गीय सिंधुताई सपकाळ, आयपीएस विश्वासराव नांगरे पाटील, खासदार अमोल कोल्हे, डॉ. प्रकाश बाबा आमटे, सौ मंदाकिनी आमटे, कीर्तनकार चारुदत्त आफळे, आयपीएस कृष्ण प्रकाश या सर्व लोकांनी येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली आहे. यावर्षी आपल्याला लाभले आहेत. नाटककार,अभिनेता, दिग्दर्शक, चित्रपट निर्माता, बिग बॉस फेम आणि सेलिब्रिटी महेश मांजरेकर. श्रोत्यांना संबोधित करण्यासाठी आणि विजेत्यांना पारितोषिकांचे वितरण करण्यासाठी सन्माननीय अतिथी म्हणून ते येणार आहेत. ५ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ६ वाजता *सजाई गार्डन* येथून सुरू होणा-या आपली फलटण मॅरॅथॉन २०२४-२५ चा एकूण टी कॅटेगरीमध्ये पुरुष व महिला असे प्रत्येकी पाहिले तीन क्रमांकांना बक्षिसे मान्यवरांच्या हस्ते दिली जाणार आहेत.
पहिले बक्षीस :- १००००
दुसरे बक्षीस :- ७०००
तिसरे बक्षीस:- ५०००
अशी सर्व मिळून १८ बक्षिसे दिली जाणार आहेत. मॅरॅथॉन पूर्ण करणा-यांना आकर्षक फिनिशर मेडला दिले जाणार आहे. तसेच भाग घेणा-या रनर्सना प्रत्येकी एक मॅरॅथॉन किट दिले जाणार आहे , की ज्या मध्ये टाईम , टी शर्ट, एनर्जी बार , टोपी आणि एक सरप्राईज गिफ्ट असणार आहे.