सोलापूर : जिल्ह्यामध्ये अन्न उत्पादन वाढीसाठी आलेले शेतकऱ्याचे प्रशिक्षण केंद्र बारामती येथे न नेता सोलापुरातच ठेवावे अन्यथा महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटना व शेकडो शेतकरी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाहीत असा इशारा राज्य शासनाला पत्रकारांशी बोलताना महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेचे प्रभाकर भैय्या देशमुख यांनी दिला आहे पुढे बोलताना देशमुख म्हणाले माझ्या सोलापूर जिल्ह्यातील आमदार अभ्यास आणि अनुभव असताना सुद्धा महाविकास आघाडीच्या काळात पर जिल्ह्यातले पालकमंत्री माझ्या सोलापूर जिल्ह्याला दिला व चालू एकनाथ शिंदे फडणवीस व अजित पवार यांच्या काळात सुद्धा पर जिल्ह्यातला पालकमंत्री आमच्या सोलापूर जिल्ह्याला दिलेला आहे.
त्यामुळे हा राज्य सरकारचा मनमानी कारभार चालू आहे अशा परिस्थितीमध्ये माझ्या सोलापूर जिल्ह्यातली सत्ताधारी पक्षाचे आमदार डोळे असून आंधळ्याची आणि कान असून बहिऱ्याची भूमिका घेत आहेत ही दुर्दैवाची बाब आहे जिल्ह्यातील आमदारांना आपली जबाबदारी सांभाळता येत नसेल तर त्यांनी राजीनामे द्यावेत असेही देशमुख बोलताना म्हणाले जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी जनतेने आपल्याला सोलापूर जिल्ह्याचे वैभव वाढवण्यासाठी विकासासाठी तुम्हाला आमदार केलेलं आहे.
आपण विधानभवनात काय करता असाही प्रतिसवाल देशमुखांनी जिल्ह्यातील सत्ताधारी आमदारांना बोलताना केला आहे .राज्याचे नेते सोलापूर जिल्ह्यावर अन्याय करत असतील तर भविष्यात त्याची किंमत सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी जनता दाखवल्याशिवाय राहणार नाही असेही देशमुख म्हणाले. शेतकऱ्यांच्या जीवनात हरितक्रांती होण्यासाठी अन्न उत्पादन वाढीसाठी प्रशिक्षण केंद्र राज्य शासनाने मंजूर केलेले असताना ते जर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मनमानी कारभाराने बारामतीला जात असेल तर जनता हा अन्याय कदापिही सहन करणार नाही. यावेळी सोलापूर जिल्हा युवक अध्यक्ष नाना मोरे संपर्कप्रमुख ज्ञानेश्वर भोसले जिल्हा कार्याध्यक्ष मोहन जमदाडे संघटक सुरेश नवले युवक जिल्हा उपाध्यक्ष निहाल मुजावर शिवशाल सावळेशवर निसार पाटील उत्तम सरडे दामाजी मोरे पप्पू दत्तू माऊली खरात गोवर्धन घोलप इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते