23.2 C
Latur
Thursday, July 18, 2024
Homeराष्ट्रीयओवेसींनी दिली संसदेत ‘जय फिलिस्तीन’ची घोषणा

ओवेसींनी दिली संसदेत ‘जय फिलिस्तीन’ची घोषणा

नवी दिल्ली : हैदराबादचे खासदार आणि एआयएमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी १८ व्या लोकसभेच्या कामकाजाच्या दुस-या दिवशी अर्थात आज खासदार म्हणून शपथ घेतली. शपथ घेतल्यानंतर ओवेसी यांनी जय फिलिस्तीन (पॅलेस्टाईन), अशी घोषणा दिली. त्यांच्या या कृत्याने आता राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

प्रोटेम स्पीकरने असदुद्दीन ओवेसी यांना लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेण्यासाठी बोलावले. ओवेसी आले आणि त्यांनी बिस्मिल्लाह म्हणत, खासदारकीची शपथ घेतली. खासदारपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी ‘जय भीम, जय तेलंगणा आणि नंतर जय फिलिस्तीन (पॅलेस्टाईन)’ अशी घोषणा दिली. यामुळे भाजप खासदारांनी संसदेत गदारोळ सुरू केला.

असदुद्दीन ओवेसी यांनी हैदराबाद लोकसभा सीटवरून सलग पाचव्यांदा निवडणूक जिंकली आहे. यावेळी त्यांना ६,६१,९८१ मते मिळाली आहेत. त्यांनी भाजपच्या माधवी लता यांचा ३,३८०८७ मतांनी पराभव केला. तत्पूर्वी, २०१९ च्या निवडणुकीत ओवेसी यांना एकूण ५८.९५% मते घेत विजय मिळवला होता. ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी हैदराबाद मतदारसंघातून सर्वप्रथम २००४ मध्ये निवडणूक जिंकून संसदेत पोहोचले होते. यानंतर त्यांनी २००९, २०१४, २०१९ आणि २०२४ मध्ये सलग विजय मिळवला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR