27.5 C
Latur
Saturday, January 18, 2025
Homeराष्ट्रीयसंभल हिंसाचाराचे पाक कनेक्शन

संभल हिंसाचाराचे पाक कनेक्शन

३ पुरावे ओरडून-ओरडून देतायेत साक्ष फॉरेन्सिक टीमने नाल्या खंगाळल्या

लखनौ : संभल हिंसाचार प्रकरणी उत्तर प्रदेश पोलिस आणि न्यायिक आयोगाकडून सुरू असलेल्या तपासातून धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. दरम्यान, मंगळवारी हिंसाचार करणा-या दंगलखोरांचे पाकिस्तान कनेक्शन समोर आले आहे. घटनास्थळी सापडलेले पुरावे याची साक्ष देत आहेत. संभल पोलिसांच्या पथकाला मशिदीजवळील नाल्यांत पाकिस्तानातील ऑर्डिनन्स फॅक्ट्रीमध्ये तयार झालेले ९ एमएमचे एक शेल सापडले आहे.

संभल हिंसाचाराच्या तपासासाठी फॉरेन्सिक टीम घटनास्थळी पोहोचली होती. दरम्यान, नाल्यांची तपासणी केली असता, पथकाला पाकिस्तानी शस्त्रास्त्र कारखान्यात तयार झालेले शेल्स (काडतूस कवच) आढळून आले. फॉरेन्सिक टीम सोबतच गुप्तचर पोलिस म्हणजेच एसआययू युनिटही घटनास्थळी पोहोचले होते. दरम्यान, अधिका-यांच्या पथकाला घटनास्थळावरून पाकिस्तान ऑर्डिनन्स फॅक्टरीमधील २ मिसफायर आणि ९ एमएमचे १ शेल मिळाले आहेत. याशिवाय १२ बोअरचे दोन आणि ३२ बोअरचे दोन शेल्सदेखील मिळाले आहेत.

संभलमधील हिंसाचारावरून जोरदार राजकारण सुरू आहे. सध्या संभल हे संपूर्ण उत्तर प्रदेशच्या राजकारणाचे केंद्र बनले आहे. सुमारे १० दिवसांपूर्वी संभलमध्ये झालेल्या हिंसाचारावरून दिवसेंदिवस राजकारण वाढताना दिसत आहे. जिल्हा प्रशासनाने संभलमध्ये कलम १६३ लागू केले आहे. या परिसरात बाहेरील व्यक्ती आणि राजकीय लोकांना प्रवेश बंदी आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR