19.6 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeक्रीडापाकिस्तानी क्रिकेटपटूने मागितली जाहीर माफी

पाकिस्तानी क्रिकेटपटूने मागितली जाहीर माफी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
टी-२० विश्वचषकात टीम इंडियाने पाकिस्तानला धूळ चारली आहे. रविवारी झालेल्या या सामन्यात भारताने पाकिस्तानचा सहा धावांनी पराभव केला. अर्शदीप सिंगने शेवटच्या षटकात जबरदस्त गोलंदाजी करत टीम इंडियाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. मात्र हा सामना सुरू असताना पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू कामरान अकमलने शीख समुदायाबाबत एक वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्या वक्तव्याबद्दल कामरानने शीख समुदायाची माफी मागितली.

भारत-पाक सामन्यादरम्यान कामरान अकमल म्हणाला, पाहा अर्शदीप सिंगला शेवटची ओव्हर टाकायची आहे. तुम्हाला माहीत आहे की १२ वाजले आहेत. यानंतर कामरान हसायला लागतो. त्याचे सहकारी तज्ज्ञ म्हणतात, कोणत्याही शिखाला १२ वाजता गोलंदाजी करायला देऊ नये.

कामरानच्या वक्तव्याचा व्हीडीओ व्हायरल झाल्यानंतर टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग भडकला असून त्याने कामरान अकमलवर जोरदार टीका केली आहे. हरभजन सिंग म्हणाला, कामरान अकमल, तुझे घाणेरडे तोंड उघडण्यापूर्वी शिखांचा इतिहास जाणून घ्या. आम्ही शिखांनी तुमच्या माता-भगिनींना आक्रमणकर्त्यांपासून वाचवले होते, त्यावेळी शीख नसते तर तुमचे १२ वाजले असते. त्यामुळे अशी वक्तव्ये करताना तुम्हाला लाज वाटली पाहिजे, असे हरभजन सिंगने फटकारले आहे.

त्यानंतर आता कामरान अकमलने त्याच्या वक्तव्याबाबत शीख समुदायाची जाहीर माफी मागितली आहे. मी केलेल्या माझ्या त्या वक्तव्याबाबत मला खंत वाटत असून मी त्यासाठी हरभजन सिंग व शीख समुदायाची माफी मागतो. माझे शब्द चुकीचे व अपमानकारक होते. मला शीख समुदायाबाबत खूप आदर आहे व त्यांच्या भावना दुखवायचा माझा कोणताही हेतू नव्हता. त्यासाठी मी मनापासून माफी मागतो, असे कामरान अकमलने ट्विट केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR