22.7 C
Latur
Saturday, July 27, 2024
Homeराष्ट्रीयपंकज नार्वेकर ठरले माउंट एव्हरेस्ट सर करणारे पहिले गोवेकर

पंकज नार्वेकर ठरले माउंट एव्हरेस्ट सर करणारे पहिले गोवेकर

पणजी : पर्वरी येथील ४१ वर्षीय पंकज नार्वेकर यांनी जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट सर करत नवा इतिहास रचला आहे. सार्वजनिक बांधकाम खात्यात सहाय्यक अभियंता असलेले पंकज नार्वेकर हे माउंट एव्हरेस्ट सर करणारे पहिले गोमंतकीय गिर्यारोहक ठरले आहेत. नार्वेकर यांनी २१ मे रोजी सकाळी ५:३० वाजता यशस्वीरित्या एव्हरेस्ट सर केला.

गेल्या कित्येक वर्षांपासून ते गिर्यारोहन करत आहेत. शिखर त्यांना नेहमीच खुनावत होते. २०१५ वर्षापासून त्यानी माउंट कामेट (७७५० मी), माउंट कुन (७०७७ मी), माउंट कांग यात्से-१ आणि २ (६४०० आणि ६२५० मी) इत्यादी महत्वाची शिखरे यशस्वीपणे सर केली आहेत. याच अनुभवाच्या बळावर अखेर त्यांनी गिर्यारोहणमधील प्रतिष्ठीत मानला जाणारा माउंट एव्हरेस्ट शिखर सर केले. यापूर्वी अशी किमया कुठल्याच गोमंतकीयाने केले नव्हती. पंकज नार्वेकर हे राज्यातील प्रसिध्द युवा गिर्यारोहण गुंजन नार्वेकर यांचे वडील आहेत. गुंजन नार्वेकर हीने अलीकडेच अनेक गिर्यारोहणाचे विक्रम मोडले आहेत. पंकज आणि गुंजन या बाप लेकीने यापूर्वी एव्हरेस्ट बेस कँपपर्यंत मजल मारली होती. एव्हरेस्ट बेस कँपपर्यंत पोहचणारी सर्वात युवा गोमंतकीय म्हणून गुंजनचे नाव घेतले जाते. गुंजनेने देखील १२ वर्षाची असताना तुंगनाथ, चंद्रशीला, व केदारनाथ ट्रॅक पूर्ण केला होता.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR