न्यूयॉर्क : विम्बल्डन २०२४ स्पर्धा अखेरच्या टप्प्यात असून गुरुवारी महिलांची एकेरीची उपांत्य फेरी पार पडली. उपांत्य फेरीत ७ व्या मानांकित जास्मीन पाओलिनी आणि ३१ व्या मानांकित बार्बरा क्रेसिकोवा यांनी विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला.
इटलीच्या पाओलिनीने डोना विकेचला २-६, ६-४, ७-६ (८) अशा तीन सेटमध्ये पराभूत केले. २ तास ५१ मिनिटे चाललेल्या या सामन्यातील विजयामुळे आता पाओलिनी अंतिम सामन्यात पोहचली आहे. ओपन एरामध्ये अंतिम सामना गाठणारी ती इटलीची पहिली टेनिसपटू ठरली आहे. याशिवाय पाओलिनी आणि विकेच यांच्यातील सामना विम्बल्डनमध्ये महिला एकेरीचा सर्वाधिक काळ चालेला उपांत्य सामना ठरला आहे. यापूर्वी सेरेना विलियम्स विरुद्ध एलिना डेमेन्तिवा यांच्यात २००९ च्या विम्बल्डनमध्ये झालेला उपांत्य सामना २ तास ४९ मिनिटे झाला होता.
क्रेसिकोवाने एलिना रायबाकिनाला केले पराभूत
क्रेसिकोवानेसिकोवाने चौथ्या मानांकित एलिना रायबाकिनाला २ तास ७ मिनिटे चाललेल्या उपांत्य सामन्यात ३-६, ६-३, ६-४ अशा तीन सेटमध्ये पराभूत केले. आता क्रेसिकोवा दुस-यांदा ग्रँडस्लॅमच्या अंतिम सामन्यात खेळताना दिसणार आहे. तिने यापूर्वी २०२१ मध्ये फ्रेंच ओपन स्पर्धा जिंकली होती.
अंतिम सामना
आता शनिवारी (१३ जुलै) पाओलिनी आणि क्रेसिकोवा यांच्यात अंतिम सामना रंगणार आहे. ऑल इंग्लंड क्लब येथे रंगणार आहे. दरम्यान, या दोघींमधील विजेत्या खेळाडूला २,७००,००० पाउंड्स बक्षीस मिळणार आहे, तर उपविजेत्या खेळाडूला १,४००,००० पाउंड्स बक्षीस मिळणार आहे.