परभणी : जिल्हा पोलीस अधीक्षक रागसुधा आर. यांची मुंबई येथे पोलिस उपायुक्त म्हणून बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी रवींद्रसिंग परदेशी यांची नियुक्ती करण्यात आली होती. नूतन पोलीस अधीक्षक परदेशी यांनी रविवार, दि.४ फेब्रुवारी रोजी अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्याकडून पदभार स्वीकारला.
परदेशी हे यापूर्वी चंद्रपूर येथे पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत होते. शनिवारी मध्यरात्री परदेशी परभणी शहरात दाखल झाले. यानंतर रविवारी त्यांनी सकाळी पोलीस अधीक्षक कार्यालयात येऊन पदभार स्वीकारला. याप्रसंगी पोलीस दलाच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले.