24.1 C
Latur
Friday, September 20, 2024
Homeपरभणीपरभणीच्या खेळाडुंचे राष्ट्रिय ट्रॅम्पोलिन ट्रम्बलींग जिम्नास्टिक स्पर्धेत घवघवीत यश

परभणीच्या खेळाडुंचे राष्ट्रिय ट्रॅम्पोलिन ट्रम्बलींग जिम्नास्टिक स्पर्धेत घवघवीत यश

परभणी : नुकत्याच १६ ते १८ फेब्रुवारी दरम्यान कालिकत केरळ येथे पार पाडलेल्या राष्ट्रिय टॅम्पोलिन ट्रम्बलींग जिम्नास्टिक स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघात असलेल्या परभणीच्या सर्वच खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत अनेक सुवर्णपदकांची लूट केली. या स्पर्धेत परभणीच्या खेळाडूंनी तब्बल १० सुवर्ण व ३ कास्य अशी १३ पदकांची कमाई करीत परभणीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला. या यशामुळे परभणी जिल्ह्यातील जिम्नास्टीक खेळाला वेगळी उंची प्राप्त झाली आहे.

केरळ येथील स्पर्धेत यश मिळवलेल्या खेळाडूंमध्ये लहान गटात प्रज्वल अंबोरे, आदित्य खळीकर, पार्थ शिंदे व हर्षद जाठोडे, ज्युनिअर गटात अभिषेक शिंदे व अनिल शिंदगे तर मोठ्या गटात शेख जुनेद, रमण सिंगितंम व महिला वरिष्ठ गटात निकिता विभुते या सर्व खेळाडूंनी सुवर्ण पदकांची कमाई केली. परभणी जिल्ह्याला तब्बल १० सुवर्णपदक (गोल्ड मेडल्स), ३ कांस्य असे एकूण १३ राष्ट्रीय पदके मिळाली. या यशस्वी खेळाडूंना प्रमुख प्रशिक्षक आंतरराष्ट्रीय कोच प्रदिप लटपटे, संदीप लटपटे व वेदांत मुंढे यांचे मार्गदर्शन लाभले. या सर्व खेळाडूंच्या यशाबद्दल जिल्हा जिमनॅस्टिक संघटनेचे सचिव उत्तमराव लटपटे व संघटनेच्या अध्यक्षा ज्ञानेश्वरी लटपटे यांनी कौतुक केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR