22.1 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeक्रीडापॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेची धडाक्यात सुरुवात, पी. व्ही. सिंधू-शरत कमलने केले भारताचे नेतृत्व

पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेची धडाक्यात सुरुवात, पी. व्ही. सिंधू-शरत कमलने केले भारताचे नेतृत्व

पॅरिस : पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेची प्रतीक्षा अखेर संपली असून, फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि हैतीचे राष्ट्राध्यक्ष थॉमस बाख यांनी सीन नदीवरील पुलावर फ्रेंच ध्वज फडकावला आणि भव्यदिव्य उद्घाटन झाले. उपस्थितांना सीन नदीवर १०० बोटींतून विविध देशांतील १० हजारांहून अधिक खेळाडूंना पाहता आले. यावेळी खेळाडूंनी चाहत्यांच्या शुभेच्छा स्वीकारल्या. देशाचे प्रतिनिधित्व केल्याचा आनंद खेळाडूंच्या चेह-यावर दिसत होता. ऑलिम्पिकच्या इतिहासात पहिल्यांदाच स्टेडियमबाहेर उद्घाटन सोहळा पार पडला.

पॅरिस ऑलिम्पिक २०२४ च्या उद्घाटन समारंभात भारतीय खेळाडू पारंपरिक पोशाखात दिसले. भारतीय चमूचे नेतृत्व पी. व्ही. सिंधू आणि शरत कमल या दोघांनी केले. सीन नदीत पार पडलेल्या संचलनात भारताच्या ७८ खेळाडूंनी भाग घेतला. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत एकूण ११७ भारतीय खेळाडूंनी भाग घेतला आहे. या सर्व खेळाडूंकडून पदकांची अपेक्षा आहे.

पहिला मान ग्रिसला मिळाला

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत २०६ देशांतील एकूण १०,७१४ खेळाडूंनी भाग घेतला आहे. त्यात अमेरिकेचे सर्वाधिक ५९२ खेळाडू आहेत. तरीदेखील या सोहळ्यात संचलन करण्याचा पहिला मान ग्रीसला मिळाला. ग्रीस देशाची बोट सर्वांत आधी सीन नदीत आली. यामागचे कारणही तसेच आहे. पहिल्या ऑलिम्पिक खेळांचे आयोजन ग्रीस (अथेन्स) येथे झाले होते. म्हणूनच पहिला मान ग्रिसला देण्यात आला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR