21.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeछत्रपती संभाजीनगरपवार साहेब गद्दार आहेत : खोत

पवार साहेब गद्दार आहेत : खोत

शिराळा : महायुतीचे नेते आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर हल्ला चढवला. शिराळा येथील प्रचार सभेत बोलताना माजी सभापती शिवाजीराव देशमुख यांच्याविरोधातील अविश्वास प्रस्तावावरून सदाभाऊ खोतांनी शरद पवारांना गद्दार म्हटले. सांगली जिल्ह्यातील शिराळा विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सत्यजित देशमुख यांच्या प्रचारार्थ सभा झाली.

या सभेत बोलताना सदाभाऊ खोत यांनी शरद पवार पवार यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, मी ज्या सभागृहात काम करतो, त्या सभागृहाचे सभापती होते, शिवाजीराव देशमुख. ते आजारी होते. घरात मशीन बसवल्या होत्या. रक्त बदलावे लागत होते. रक्त बदलल्यावर ते उठून कामाला लागायचे. ते सभापती होते. त्यांच्यावर तुम्ही (शरद पवार) कठीण काळात अविश्वास ठराव आणला. पवार साहेब, ही तुमची गद्दारी आहे अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR