24 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeपरभणीपेडगाव जि. प. सर्कलमध्ये विकासनिधी कमी पडू देणार नाही

पेडगाव जि. प. सर्कलमध्ये विकासनिधी कमी पडू देणार नाही

परभणी : तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत आसलेल्या पेडगाव व पेडगाव जिल्हा परिषद सर्कलमध्ये विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही आ. बाबाजानी दुर्राणी यांनी दिली. ते पेडगावं येथे २ कोटी २४ लक्ष रुपयांच्या निधीतून केल्या जाणाºया विविध विकास कामांच्या उद्घाटन कार्यक्रमात गुरुवार, दि.१ बोलत होते.

यावेळी महंत देमेराज बाबा कपाटे, महंत बाभूळगावकर बाबा शास्त्री, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष देशमुख, मध्यवर्ती बँकेचे संचालक दत्तराव मायंदळे, सरपंच सविताबाई हरकळ, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष सुरेशराव देशमुख, उपसरपंच शेख सलमान, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष मनोज राऊत, चेअरमन दिपक देशमुख, व्हॉईस चेअरमन मधुकर गायकवाड, अंबादासराव सुरवसे, बाळासाहेब देशमुख, मनोहरराव हरकळ, माऊली कदम, विजयराव हरकळ, आशीष हरकळ, प्रशांत हरकळ आदिंची उपस्थिती होती. यावेळी श्रीकृष्ण मंदिर सभागृह २५ लक्ष, जिल्हा परिषद शाळा पेव्हर ब्लॉक बसवणे २५ लक्ष, भूमिगत नाली बांधकाम ३४ लक्ष, घनकचरा व्यवस्थापन ६० लक्ष, जिल्हा परिषद उर्दू शाळा पेव्हर ब्लॉक बसवणे २५ लक्ष, पेडगाव तलाव ते पाणी टाकी पर्यंत नवीन पाइपलाइन ३० लक्ष, प्रत्येक घराला नळ कनेक्शन २५ लक्ष असे एकूण २ कोटी २४ लक्ष रुपयांच्या विकास कामांचे उद्घाटन आ. बाबाजानी दुर्राणी यांच्या हस्ते करण्यात आले.

सूत्रसंचालन कुणाल हरकळ यांनी तर प्रास्ताविक संतोष देशमुख यांनी केले. कार्यक्रमाला भारत घुले, रमेशराव साबळे, मधुकरराव खरवडे, सुदामराव खरवडे, कांचन कदम, गोपाळ आव्हाड, कैलास बोचरे, अजीम पठाण, शिवाजीराव मोरे, शेख अकबर, श्रीराम मोरे, नितिन मोरे, ग्रामसेवक प्रल्हाद, सोळंके रावसाहेब पुंड, शेख, मेहराज माणिकराव रन्हेर, पांडुरंग हरकळ, नवनाथ मेटे, आबासाहेब तायनाथ आदिंची उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दिपक देशमुख, रणजीत हरकळ, गोपाळ देशमुख, अच्युत हरकळ, हरेश पठाण, पुरशोत्तम देशमुख, निखील मांडे, बालासाहेब खरात आदींनी परिश्रम घेतले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR